धाडस अंगलट आले सिरसाळा अंबाजोगाईजवळ पिकअप वाहनांसह एक जण वाहून गेला…
रोखठोक न्युज वार्ताहर
बीड जिल्ह्यात परतीच्या पावसाने हाहकार माजला असून शेतकऱ्यांवर आसमानी संकट कोसळले असून ओढे नाल्या नदी दुथडी भरून वाहत आहेत. सिरसाळा मोहा अंबाजोगाई रस्त्यांवरील कांन्नापूर येथील गव्हाडा ओढा पाण्याने तुडुंब भरून वाहत आहे.
या ओढ्यात धाडस करून एक जणांनी चार चाकी पिकपअ घेऊन जाण्याचा धाडस अंगलट आले असून पिकपअ सहित तीन जण वाहून गेल्याची घटना आज दुपारी नुकतीच घडली आहे. यात तीन एक जण वाहून गेल्ले होते. दोन जण यातून सुखरूप बचावले असून एक जण वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
पुढे झुडूपाला अडकलेल्या पिकअपला जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले आहे.
राईस अन्सर अत्तार (वय 35) वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.याबाबत शोध सुरू आहे.