उमरी रोडची पटकथा लिहीण्या साठी एक महिन्याची मुदत वाढवली.
तर वार्ड क्रमांक आठ ला नायक नसल्याने सिनेमा रखडलेलाच.
उमरी रोड नावाचा सिनेमा गेल्या वीस वर्षा पासून रखडलेल्या अवस्थेत पडून आहे कधी कोणी मनावर घेतल नाही तर कधी दोन कंपन्यांच्या भांडणात हा सिनेमा खोळबंलेला होता.शहरातील प्रत्येक सिनेमात काम करणारा नायक,पाहूणे कलाकार असे रोल करणारा नायक या काळात स्वनिर्मित “मी नगरसेवक” पार्ट एक पार्ट दोन घेऊन आले आणि दोन्ही पडले,पण या वेळेस 3 मार्च लाच फायनान्सरने थोड थोडके नव्हे तर 98 लक्ष रूपय उमरी रोड बनवण्या साठी दिले पण निर्माता,दिग्दर्शकाने गेल्या आठ महिन्यांपासून हि गोष्ट लपवली.त्याच वेळेस ही गोष्ट माध्यमातून नायकाला कळली आणि पुन्हा एकदा कास्टिंग साठी नायकाची धडपड चालु झाली.नायक म्हणून लागला, हा सिनेमा माझा आहे तुम्ही लवकर चालु करा नाहीतर मी आंदोलन करेल मग नायकाची समजुत घालून एक महिन्यात सिनेमा चालु करतो म्हणून अश्वासीत केल व पुढची पटकथा लिहीण्या साठी घेतली आता एक महिन्या नंतरच कळेल पुढची कथा.तत्पूर्वी या सिनेमा बरोबर च वार्ड क्रमांक आठ नावाच्ये स्वतःच्या पोर्डक्शन साठी सुद्धा 35 लाख रूपय आले आहेत पण तिथे कोणीच नायक नसल्या मुळे सिनेमा बनवायचा का नाही हे पुर्ण पणे निर्माता दिग्दर्शकावर अवलंबून आहे एखादा नायक मिळाल्या(झाल्या) शिवाय हा सिनेमा पुर्ण होण्यास धुसरता जाणवत आहे.