• Fri. Jun 5th, 2026

*डोणगाव येथे विहिरीत पडून वीस वर्षीय विवाहित तरुणीचा मृत्यू*   

Bybaba maske

Oct 31, 2022

डोणगाव येथे विहिरीत पडून वीस वर्षीय विवाहित तरुणीचा मृत्यू 

 

गौतम बचुटे / केज :-

शेतात जात असताना वाटेत तहान लागल्याने विहिरीवर पाणी पिताना पाय घसरून पडलेल्या २० वर्षीय विवाहितेचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना डोणगाव ता. केज येथे सोमवारी दुपारी २:०० वाजता घडली.
डोणगाव ता. केज येथील वैष्णवी लक्ष्मण भुसारे वय (२० वर्ष) ही विवाहित तरुणी आपल्या सासु सोबत सोमवारी दुपारी २:०० वा.च्या सुमारास शेतात जात होती. वैष्णवी भुसारे हिला वाटेत तहान लागल्याने ती रस्त्याच्या कडेला असलेल्या नवनाथ घुले यांच्या शेतातील विहिरीवर पाणी पिण्यासाठी गेली. पाणी पीत असताना पाय घसरल्याने ती विहिरीत पडली. त्या नंतर तिच्या सासूने आरडा ओरडा करून नागरिकांना मदतीला बोलाविले. मात्र तो पर्यंत वैष्णवी भुसारे हिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस नाईक दिलीप गित्ते, महादेव बहिरवाल, बाळासाहेब अहंकारे, शमीन पाशा यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. केज येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!