• Sun. Apr 19th, 2026

*देणे-घेण्याला कंटाळून ३२ वर्षीय महिलेची गळफास घेऊन आत्महत्या*

Bybaba maske

Oct 31, 2022

 

देणे-पाण्याला कंटाळून ३२ वर्षीय महिलेची गळफास घेऊन आत्महत्या.

 

गौतम बचुटे / केज :-

घर खर्च व इतर खाजगी कामासाठी हातउसने घेतलेले पैसे कसे फेडायचे ? या विचाराने चिंताग्रस्त झालेल्या ३२ वर्षीय महिलेने घरातील स्लॅबच्या हुकाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जाधवजवळा ता. केज येथे घडली.
जाधवजवळा ता. केज येथील शिवानी अंकुश जाधव वय (३२ वर्ष ) या महिलेने घर खर्च व इतर खाजगी कामासाठी हात-उसने पैसे घेतले होते. ते वेळेवर परत करता न आल्याने हे पैसे फेडायचे कसे ? या विचाराने चिंताग्रस्त झालेल्या शिवानी जाधव या महिलेने टोकाची भूमिका घेतली. तिने घरातील स्लॅबच्या हुकाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे रविवारी ( दि. ३० ) पहाटे ३.४५ वाजेच्या सुमारास उघडकीस आले. या घटनेची माहिती मिळताच प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके, केज ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, फौजदार राजेश पाटील, पोलीस नाईक त्रिंबक सोपणे, दिलीप गित्ते, संतोष गित्ते यांनी घटनास्थळी भेट दिली. येथील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. या महिलेस एक मुलगा असून पती अंकुश जाधव यांच्या खबरे वरून केज पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस नाईक त्रिंबक सोपणे हे तपास करत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!