बहिणीच्या लग्नाचे कर्ज फेडू तरी कसे असे म्हणून सततच्या नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून २० वर्षीय भावाने घेतला गळफास !
गौतम बचुटे/केज :- बहिणीच्या लग्नाचे कर्ज फेडावे कसे ? कारण मागील तीन वर्ष सतत नापिकिपीमुळे चिंताग्रस्त असलेल्या वीस वर्षीय भावाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
या बाबतची माहिती अशी की, बीड जिल्ह्यातील देवगाव ता. केज येथे रविवार दि. ३0 ऑक्टोबर रोजी दुपारी २:०० वा च्या सुमारास दीपक बालासाहेब मुंडे याने घरातील पत्र्याच्या अडूला गळफास घेऊन आत्महत्या केली. दीपक मुंडे याच्या बहिणीच्या लग्नात झालेले कर्ज आणि वडिलांच्या नावे असलेले बँकेचे कर्ज हे सततच्या नापिकीपी मुळे फेडता येत नसल्याच्या विवंचनेतून दीपक मुंडे याने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. पांडुरंग रामा मुंडे यांच्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्र. ६/२०२२ फौजदारी गुन्हे प्रक्रिया संहिता १७४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रभारी सहाय्य पोलिस निरीक्षक संतोष मिसळे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदुरघाट दूरस्थ पोलिस चौकीचे पोलिस हेडकॉन्स्टेबल अभिमान भालेराव हे तपास करीत आहेत.