• Sun. Apr 19th, 2026

*केज तालुक्यात कुत्र्या ऐवजी माणसेच माणसाला चावण्याच्या घटना वाढल्या !*

Bybaba maske

Oct 30, 2022

केज तालुक्यात कुत्र्या ऐवजी माणसेच माणसाला चावण्याच्या घटना वाढल्या !

 

शेत मुनाफ्याने करणे भोवले ; आधी केली मारहाण मग चावले

 

गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील तांबवा येथे शेत मुनाफ्याने करणे चांगलेच अंगलट आले चक्क एका शेत मालकाच्या भावाने मुनाफ्याने शेत करणाऱ्याला मारहाण करून चावा घेतल्याची घटना घडली आहे.
केज तालुक्यातील तांबवा येथे नवनाथ रामकीसन चाटे यांनी गावातील एकाची शेतजमीन मुनाफ्याने केलेली आहे. त्या जमिनीत नवनाथ चाटे यांनी खरीप हंगाचे पिकांची पेरणी केलेली आहे. दि. २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५:३० ते ६:०० वा. च्या दरम्यान विलास इंदर चाटे, इंदर रामभाउ चाटे आणि कैलास इंदर चाटे सर्व रा. तांबवा ता. केज यांनी संगनमत करून त्यांच्या भावाचे शेत हे नवनाथ चाटे याने मुनाफ्याने का केले ? असे म्हणुन नवनाथ चाटे याला दगड व काठीने मारहाण करून त्याला चावा घेवुन जखमी केले. तसेच शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.
जखमी नवनाथ चाटे याने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार सुरू असताना पोलिसांना दिलेल्या जबाबावरून दि. २९ ऑक्टोबर रोजी केज पोलिस ठाण्यात विलास इंदर चाटे, इंदर रामभाउ चाटे आणि कैलास इंदर चाटे या तिघांच्या विरुद्ध गु. र. नं. ४९८/२०२२ भा. दं. वि. ३२४, ३२३, ५०४, ५०६ आणि ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष मिसळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक दिलीप गित्ते हे करीत आहेत.
——————————————–

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!