• Fri. Jun 5th, 2026

*येडेश्वरी साखर कारखाना युनिट नं १ चा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ संपन्न*

Bybaba maske

Oct 30, 2022

येडेश्वरी साखर कारखाना युनिट नं १ चा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ संपन्न

केज (प्रतिनिधी) – येडेश्वरी साखर कारखाना लि. युनिट नं १ आनंदगाव सा. या कारखान्याचा सन २०२२ – २३ या गळीत हंगामातील ९वा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ रविवार दि.३० ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ११.२५ वा. संपन्न झाला.
यावेळी कारखान्याचे सर्वेसर्वा बजरंग सोनवणे व त्यांच्या सुविद्य पत्नी सारिका सोनवणे, तुकाराम वटाणे व त्यांच्या सुविद्य पत्नी वंदना वटाणे यांच्या हस्ते विधीवत पूजा करून कारखान्याचे सर्वेसर्वा बजरंग सोनवणे व त्यांच्या सुविद्य पत्नी सारिका सोनवणे यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन कण्यात आले.
यावेळी सोनवणे बोलताना म्हणाले कि, 2022-2023 गळीत हंगामात शेतक-यांना सरासरी 2800 रुपये भाव देणार
तसेच शतकरी बांधवांना उधार मळी देऊन त्याची रक्कम ऊसाच्या बिलातून कपात करून घेण्यात येईल. येणा-या ६ नोव्हेंबर सन २०२२ -२३ हंगामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे असे सोनवणे म्हणाले.
या कार्यक्रमासाठी सर्व सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी, व कर्मचारी उपस्थित होते.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!