• Sun. Apr 19th, 2026

बहुजन विकास मोर्चाच्या अंबाजोगाई शहराध्यक्षपदी गौतम शिनगारे

Bybaba maske

Nov 7, 2022

बहुजन विकास मोर्चाच्या अंबाजोगाई शहराध्यक्षपदी गौतम शिनगारे

गौतम बचुटे/केज :- बाबुराव पोटभरे यांच्या बहुजन विकास मोर्चाच्या अंबाजोगाई शहराध्यक्षपदी गौतम शिनगारे यांची निवड करण्यात आली.

अंबाजोगाई येथे बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक बाबूरवजी पोटभरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. बैठकीत अंबाजोगाई शहर अध्यक्षपदी गौतम शिनगारे यांनी निवड करण्यात आली. या प्रसंगी बाबूरवजी पोटभरे यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देऊन शहरात बहुजन विकास मोर्चाच्या माध्यमातून समाजावरील अन्याय अत्याचार रोखण्यासाठी व पार्टीचे विचार समाजातील तळागाळात रुजवून पक्ष संघटन मजबूत करावे आणि संस्थापक बाबूरवजी पोटभरे यांचे हात मजबूत करण्यासाठी कार्य करण्याचे अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

यावेळी बहुजन विकास मोर्चाचे नेते श्रीहरी नाना मोरे, जिल्हा कार्यकारी अध्यक्ष विनोद शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!