• Mon. Jul 27th, 2026

काकाजी तुम्ही बरोबरच केल!!!मुजोर आधिकारी भ्रष्टाचार करताना डोळे झाकतात,प्रश्न विचारताच पळ काढतात.

Bybaba maske

Nov 13, 2022

काकाजी तुम्ही बरोबरच केल!!!

मुजोर आधिकारी भ्रष्टाचार करताना डोळे झाकतात,प्रश्न विचारताच पळ काढतात.

 

 भाटुंबा गावातील संरपचा सहित गावकरी तहसील कार्यालय समोर गेल्या चार दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत,साप निघून गेल्यावर भुई धोपटायच काम अधिकारी करत आहेत,गेल्या पाच वर्षा पासुन ग्रामसेवक,ग्रामपंचायत च्या माध्यमातून चाललेला भ्रष्टाचार डोळे बंद करून पहाणारे आधिकारी आज केज विधानसभेतील आमदार नमिताताई मुंदडा यांच्या माध्यमातून प्रश्न विचारला, तर आधिकारी रजा टाकून पळून गेले.मग यात दोष आमदाराचा किंवा त्यांच्या सासऱ्याचां कसा?कधी कोणत्या ग्रामपंचायत मध्ये जाऊन झाडाझडती घेऊन गटविकास आधिकार्यानी भ्रष्टाचार उघड केला, असा एक ही दाखल देता येईल का?ज्या वेळेस जिवावर बेतनार अंदोलन पुकारल जात, त्या वेळेस जाग येते व चौकशीचा फार्स करण्याच नाटक केल जात.आज ही जिल्हा परिषद च्या मुख्याधिकारी साहेबाने सुमित जाधव गटविकास आधिकारी यांच्या नेतृत्वाखाली दोन जनाची समीती गठीत केली आहे.  पण उपोषण करते म्हणतायत, आमच हे मुद्दे.. मनरेगाच्या कामावरील मजुरांच्या कामाचे वेतन अदा झालेले नाहीत [संगणक] चोरीला गेले आहेत. राष्ट्रीय पेयजल योजनेत केलेल्या भ्रष्टाचार. अंगणवाडी बांधकाम चे खोटे दस्तावेज दाखवून पैसे उचलले आहेत  आरओ फिल्टर न बसवता कागदावर दाखवून पैसे उचलले आहेत. आरवो फिल्टरी साठी रूम बांधकाम न करता पैसे उचले आहेत. इंदिरा आवास योजनेत मंजूर असलेल्या काम न करता जुने काम दाखवून पैसे उचलले आहेत. ग्रामपंचायत वर प्रश्न उपस्थित  करणावर खोटे गुन्हे दाखल केले गेले आहेत. या अशा सर्वाची चौकशी करून कारवाई का केली नाही? असा सवाल सर्वसामान्य जनतेमधून व उपोषण करत्यातुन उपस्थित केला जात असून या संपूर्ण कामांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिका-यावर व भ्रष्टाचाराच्या वर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आमच्या समोर चौकशी करून लगेच तिथल्या तिथे अहवाल द्या अशी मागणी उपोषण कर्ते करत आहेत.

मतदार याद्या व वार्ड रचनेत मोठा घोळ घातल्याचे उघड!

केज तालुक्यातील भाटुंबा गावा त्यांच्या मतदार संघात आहे. आणि त्या गावाची ग्राम पंचायत त्यांच्या गटाच्या ताब्यात असल्यामुळे काही खोडसाळ अधिकाऱ्यानी आणि कर्मचा-यांनी तेथील मतदार याद्या व वार्ड रचनेत मोठा घोळ घातल्याचे उघडकीस आले आहे. नवरा एका प्रभागात तर बायको एक प्रभागात आणि घरचे सगळे तिस-याचप्रमागात जाणून बुजून टाकले आहेत. हिबाब नंदू शेठ यांच्या लक्षात आल्याने त्याना आमदार नमिता मुंदडा याना सूचना देऊन तहसीलदार यांना चौकशी करून कारवाई केली, त्यावर तहसीलदार यानी  समिती स्थापन केली मात्र माशी कुठे शिकली देव जाणे, परंतु या समितीचा अहवाल अद्य प्राप्त झाला नाही. या व अशा बाबतीत लोकप्रतिनिधी या नात्याने नंदू शेठ मुंदाडा जर त्याना विचारणा केली तर त्यामध्ये वावगे असे काहीच नाही. सर्वसामान्य जनतेच्या कामाप्रती नंदू शेठ मुदडा यांनी लोकप्रतिनिधी त्याने पाठपुरावा केला असेल आणि हा पाठपुरावाच गुन्हा ठरत असेल तर नंदू शेठ यांनी हा गुन्हा एकदा नव्हे तर शंभर वेळा केला तरीही चालेल, अशा भावना जनसामान्यांमधून केल्या जात आहेत.

एकतर बोगस कामे करणारआणि उघडी पडली म्हणून पळून जाणार का ?

जनतेच्या कामाबद्दल अधिका-यांना विचारना करणे हा गुन्हा आहे का?लोकप्रतिनिधींनी विचारणा केली तर त्याचा अधिकाऱ्यांना घुसडा येण्याची गरजच नाही!आज रजेवर गेले आहात म्हणजे काय झाले? उद्या तर रुजू व्हावेच लागेल!

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!