खरा मालक अंधारात ठेवून बनावट मालक व बोगस कागदात्राद्वारे प्लॉटचे खरेदी खत केले ; तिघा विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
रोखठोक न्यूज गौतम बचुटे, केज:-
केज येथील सहाय्यक उपनिबंधक कार्यालयात, एका बारामतीत राहत असलेल्या स्थावर मालमत्ता असलेल्या व्यक्तीच्या नावावर असलेला ३.६० आर क्षेत्रफळाचा प्लॉट हा त्याच्या परस्पर एका बनावट व्यक्तीला उभे करून आणि बनावट साक्षीदार यांची साक्ष घेऊन बनावट कागद-पत्राद्वारे नावावर करण्याचा बोगस प्रकार उघडकिस आला आहे. विशेष म्हणजे तत्कालीन दुय्यम निबंधक आणि कर्मचारी यांनी संगनमत करून चक्क कार्यालयीन वेळ संपल्या नंतर सायंकाळी ७:०० वाजता दस्तनोंदणी केली आहे. या प्रकरणी आता न्यायालयाच्या आदेशा नुसार आणि मूळ मालकाच्या तक्रारी वरून तिघा विरुद्ध फसवणूक आणि अन्य गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पुणे जिल्ह्यातील सोरडे वस्ती, खंडाज तालुका बारामती येत प्रवीण दादा निकम यांच्या नावे केज येथील गट नंबर २२८/२/४ मध्ये ०३.६० आर म्हणजे साडेतीन आर जमीन त्यांनी सन रीतसर खरेदी १७ जानेवारी २०२३ रोजी खरेदी केलेली आहे. या खुल्या प्लॉट बाबत कोणताही वाद नाही.
परंतु दिनांक १४ मे २०२५ रोजी दुय्यम निबंधक कार्यालय केज यांचे खरेदी खत डे. बु.नं १६८१/२०२५ दि. १४ मे २०२५ रोजी प्रवीण निकम हे दुय्यम निबंधक कार्यालय केज जि बीड येथे सदरील खरेजी खत करणे कामी आलेले नसतांना बोगस बेकायदेशीर चुक दस्त अन्वये आरोपी रोहन रवींद्र कोमटवार याने अधिकाऱ्यांशी संगनमत करून आणि खोटे साक्षीदार हजर स्वत: हाचे नावे बोगस रजिस्ट्री करून घेतला. त्या खरेदी खतावर सह्या असलेले साक्षीदार प्रितम प्रकाश नांदेडकर आणि शांतीनाथ प्रकाश काळे रा. धारूर तसेच कार्यालयात व्यवहार करता वेळी त्यांनी एका टोपी घातलेल्या अज्ञात व्यक्तीला कॅमेऱ्या समोर उभे केले आणि त्यावर जुन्या दस्त ऐवजा वरील प्रवीण निकम यांचा फोटो वापरला आहे. खरेदी खताला हद्द कायम पोट हिस्सा जमीन मोजणी नकाशा जोडलेला आहे, परंतु प्रवीण निकम यांनी कधीही उपअधिक्षक भुमी अभिलेख केज जि. बीड यांच्या कडुन हद्द कायम पोट हिस्सा जमीन मोजनी नकाशा मिळणे कामी अर्ज दाखल केलेला नव्हता. तो नकाशा देखील बोगस व बेकायदेशीर आहे.
हा प्रकार लक्षात आल्या नंतर प्रवीण निकम यांनी तक्रार करूनही त्याची दखल न घेतल्याने त्यांनी केज येथील न्यायालयात दाद मागितली. त्या नुसार मा. न्यायालयाच्या आदेशाने प्रवीण निकम यांनी दिलेल्या तक्रारी वरून रोहन रविंद्र कोमटवार (रा. गल्ली केज), प्रितम प्रकाश नांदेडकर (रा. आयोध्या नगर धारूर), शांतीनाथ प्रकाश काळे (रा. संभाजी चौक धारूर) या तिघांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. ५६०/२०२६ भा. न्या. सं. २३५, २३६, २३७, ३१८(२), ३१८(४), ३१९, ३३६(२), ३३६(३), ३३६(४), ३४०, ३(५) यासह नोंदणी अधिनियमाचे कलम ८२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब रोडे हे तपास करीत आहेत.
________________
*
