30 वर्षांच्या अखंड सेवेतून निवृत्त; सहकारी झाले भावूक
बनसारोळा( प्रतिनिधी) धिवार राजकुमार
तालुक्यातील बनसारोळा येथील आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथील आदर्श शिक्षक
देशमुख बन्सीधर आनंदराव हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्याअनुशंगाने संस्थेचे सचिव बालासाहेब काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरोप समारंभाचा कार्यक्रम दिनांक 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता ठेवण्यात आला.
निरोपाच्या कार्यक्रमाची सुरुवात शिक्षण महर्षी कल्याणराव काकडे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापिका सिंधूताई चव्हाण यांच्या प्रस्ताविकाने झाली. यावेळी प्रा.विष्णू कावळे, दिलीप पारेकर, सुनिल देवगावकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संस्थेचे सचिव बालासाहेब काकडे, कोषाध्यक्ष मुरलीधर काकडे, संचालक अमोल काकडे, मुख्याध्यापिका सिंधूताई चव्हाण यांच्या हस्ते बन्सीधर देशमुख सरांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना बन्सीधर देशमुख सरांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. उत्तम चित्रकार, क्रिडा प्रेमी आणि गणित विषयाचे विद्यार्थी प्रिय शिक्षक असलेले बन्सीधर देशमुख सरांनी नेहमीच हसत मुखाने आणि स्वताला झोकून देऊन अध्यापन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शंकर पवार यांनी केले, तर आभार प्रा.शिवाजी मांदळे सरांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक इतर कर्मचारी उपस्थित होते .गणपत पांचाळ,सर दिलीप पारेकर,सर रामदास अंबाड सर सुनिल देवगावकर सर संतोष रोकडे सर सुनिल साळुंके सर विष्णू कावळे सर उमाकांत मुंडे सर वैभव खाडे सर अंबाड मॅडम येडले मॅडम खेरूडकर मॅडम यादव मॅडम नरके मॅडम काळे मॅडम तुकाराम कापसे सर रमेश कदम सर प्रमोद मोरे सर विजयकुमार काकडे सेवक जोगदंड, रतन पुजारी, गिरीधर जोगी यांनी विशेष प्रयत्न केले.