दिव्यांग मंत्रालयाची घोषणा होताच केजमध्ये फटाके वाजवून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा !
गौतम बचुटे/केज :- महाराष्ट्र शासनाने दिव्यांग मंत्रालयाची घोषणा केली त्याचा जल्लोष प्रहार संघटनेच्या वतीने केज येथे शिवाजी चौकात ढोल ताशा व हलगी वाजवून एकमेकांना पेढे भरवून आणि फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
या बाबतची माहिती महाराष्ट्र शासनाने स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाची घोषणा केली आहे. ३ डिसेंबर राष्ट्रीय दिव्यांग दिना निमीत्त या मंत्रालय सुरू होणार आहे. त्या निमित्त प्रहार संघटनेचे आ. बच्चू कडू यांच्या आदेशा नुसार केज येथील दिव्यांग बांधवांनी शिवाजी चौकात ढोल, ताशा हलगी वाजवुन आणि एकमेकांना पेढे भरविले. तसेच फटाक्यांची आतिषबाजी केली. या वेळी लक्ष्मण काळे, बिभीषण अंबाड, सर्जेराव तपसे, ओमप्रकाश चाटे, किसन सत्वधर, सोपान मुळे, लिंबराज मुंडे ,महादेव डोईफोडे,संजय जाधव, पद्मिन तारडे, मनीषा आगरकर, शिवशाला वायबसे यांच्यासह तालुक्यातील प्रहार संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते