• Mon. Apr 20th, 2026

केजचे आकाश गायकवाड यांनी भारत जोडो यात्रेत सहभाग घेऊन राहुल गांधी यांच्याशी संवाद साधला.

Bybaba maske

Nov 24, 2022

केजचे आकाश गायकवाड यांनी भारत जोडो यात्रेत सहभाग घेऊन राहुल गांधी यांच्याशी संवाद साधला.

रोखठोक वार्ताहर 

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर पर्यंत भारत जोडो पदयात्रा काढली असून नुकतीच ती यात्रा महाराष्ट्रात चौदा दिवसात नांदेड जिल्ह्यातील देगलुर येथून प्रवेश करून पुढे हिंगोली – वाशिम – अकोला – बुलढाण्यातील जळगाव – जामोद मार्गे जवळ – जवळ चारशे कि.मी. प्रवास करून काल मध्यप्रदेश मध्ये दाखल झाली आहे.
या यात्रेमध्ये खासदार रजनीताई पाटील, माजी मंत्री अशोकराव पाटील, युवा नेते आदित्य पाटील जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, उपाध्यक्ष राहुल सोनवणे, युवा नेते पशुपतीनाथ दांगट यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात धडाडीने कार्यरत असलेले सुशिक्षित युवक आकाश गायकवाड यांनी भारत जोडो यात्रेत नांदेड (देगलुर) ते बुलढाणा (जळगाव – जामोद) पायी चालून सहभाग घेतला. या दरम्यान आकाश गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्याशी सवांद साधला तसेच त्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘ बुद्ध आणि त्यांचा धम्म ‘ हे पुस्तक भेट म्हणून दिले. राहुल गांधींनी देखील ती भेट आनंदाने स्वीकारून आभार व्यक्त केले व थोडक्या वेळात विचारपूस ही केली.
याप्रसंगी राहुल गांधी यांनी आकाश गायकवाड यांना विचारले की, आप मुझसे क्या चाहते हो? त्यावेळी आकाश गायकवाड यांनी राहुल गांधी यांना सांगितले की, आप हमारे देश के प्रधानमंत्री बने और देश मे जो बेरोजगारी, महंगाई बढ गयी है उसे खतम किजिये. लोकतंत्र और संविधान को बचाये रखने के लिये, किसानो को न्याय देणे के लिये, मेरे जैसे युवाओं का भविष्य बेहतर करणे के लिये आप जैसे नेता का प्रधानमंत्री होना बहुत जरुरी है, इसलिए हम भी पुरी मेहनत और लगन के साथ प्रयास करेंगे ये विश्वास देता हूं.
त्यांनतर राहुल गांधी यांनी विचारले आप कहासे हो? तर आकाश यांनी सांगितले की बीड डिस्ट्रिक्ट से हूं, मेंबर ऑफ पार्लमेंट रजनीताई पाटील जी के गावं से हू, हे ऐकताच राहुल गांधी यांनी आणखी आपुलकीने विचारपूस करून ‘ आप की सोच अच्छी है, यात्रा पुरी होणे के बाद दिल्ली आ के मिलो’ असं बोलून निरोप घेतला.
सर्वसामान्य माणसांसोबत मिळून मिसळून बोलणारे, त्यांचे प्रश्न ऐकून घेणारे, राहुल गांधी हे देशातीलच नव्हे तर जगातील एकमेव नेते असतील असा विश्वास आकाश गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केला.
खासदार रजनीताई पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, युवक नेते सत्यजित तांबे , माजी नगराध्यक्ष आदित्य पाटील यांच्या सहकार्याने राहुल गांधी यांची भेट होऊ शकली याबद्दल आकाश गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!