शंभरहून अधिक पालकत्व स्वीकारणाऱ्या गौरी शिंदे यांना मानाचा पुरस्कार.
रोखठोक वार्ताहर
येथील सामाजिक कार्यकर्त्या गौरी शिंदे यांना महाराष्ट्र लोकविकास मंचचा ‘उल्लेखनीय ट्रान्सजेंडर सेवाकार्य’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण मानवी हक्कदिनी,१० डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे.
सामाजिक कामात नेहमी अग्रेसर असलेल्या गौरी शिंदे यांनी कोरोना काळात सामाजिक बांधिलकी जोपासत गरिबांना स्वखर्चातून किराणा साहित्याची मदत केली. सामाजिक विकास व सामाजिक परिवर्तनासाठी केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल महाराष्ट्र लोकविकास मंचने घेत त्यांची उल्लेखनीय ट्रान्सजेंडर सेवाकार्य पुरस्कारासाठी निवड जाहीर केली. १० डिसेंबर २०१२ रोजी मानवी हक्कदिनी इन्फंट इंडिया येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र लोकविकास मंचचे अध्यक्ष विश्वनाथ तोडकर, उपाध्यक्ष भूमिपुत्र वाघ यांनी सांगितले.