अंबाजोगाई – अहमदपूर मार्गावर गिरवली पाटीवर झाला अपघात
एक ठार एक जखमी
रोखठोक वार्ताहर
अंबाजोगाई- अहमदपूर महामार्गावरील गिरवली पाटी येथे रस्त्याच्या मधोमध उभारण्यात आलेल्या अनधिकृत चौकाला कारची जोरात धडक लागून एक तरुण ठार व एक गंभीर जखमी झाला. हा भीषण अपघात गुरुवारी (दि.१५) रात्री झाला.
आंबेजोगाई तालुक्यातील धर्मापुरी जवळील मौजे सौंदना येथील रहिवासी सुर्यकांत उर्फ सुनिल पाटलोबा फड (वय ३०) व त्यांचा मित्र मित्र हे गावाकडून इरटिगा कारमधून (एमएच २४ एडब्ल्यू ४८२६) येत असताना अंबाजोगाई- अहमदपूर महामार्गावर गिरवली पाटी येथे रस्त्याच्या मधोमध उभारण्यात आलेल्या अनधिकृत चौकाला इरटिगा कारची जोराची धडक बसली आणि पलटी खात खड्यात जाऊन पडली. या अपघातात सुर्यकांत फड यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या सोबतचे सहकारी घटनास्थळी आढळून आले नसून त्यांचा सध्या फोनही लागत नाही. ते नेमके कुठे गेलेत किंवा काय झाले यासाठी ग्रामस्थ परेशान आहेत.
फड यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश
तीस वर्षीय सूर्यकांत फड हे विवाहित असून त्यांना दोन छोटे तीन वर्षापर्यंतचे लहान बाळ आहेत. अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाल्यामुळे पत्नी, आई-वडिलांचा आक्रोश व लहान बाळांना पाहून सार्वजन हेलावून गेले.
महामार्गावरील अनधिकृत चौक कशासाठी?
कुठलाही राज्यमार्ग किंवा नॅशनल हायवे यावर रस्त्याच्या मधोमध कुठल्याही महापुरुषांच्या नावाने किंवा कोणाचेही अनधिकृत चौक उभे करू नयेत अशा सूचना असतात. मात्र महामार्गावरील गावोगावी वेगवेगळ्या ठिकाणी हायवेवर अनधिकृत चौक निर्माण केलेले आहेत. यामुळे नकद लहान-मोठे अपघात घडत असून अनेकजण जखमी किंवा मयत झाले आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी रस्त्याच्या मधोमध उभारण्यात आलेले अनधिकृत चौक हटवावेत, चौक बनवायचेच असतील तर रस्त्याच्या कडेला असावा अशी माफक अपेक्षा नागरिक करत आहेत.