एचपीएम ने हजारो झाडे तोडून एक ही लावले नाही.राष्ट्रीय हरित लवदा कडे तक्रार.
रोखठोक न्युज वार्ताहर
मांजरसुबां ते अहमदपूर महामार्गावर दुतर्फा तीस चाळीस वर्षा पुर्वीचे मोठ मोठे वड,पिंपळ असे वृक्ष होते ते नवीन महामार्गा बनवताना तोडले.गेल्या कित्येक वर्षा पासुन वाटसरूंना भेटणारी सावली क्षणात नष्ट झाली.महामार्गा तयार झाल्या नंतर पुन्हा वृक्षाची लागवड करून ते जोपासणं हे रस्ता बनवणाऱ्या कंपनीचे काम आहे तसी कंपनीला शासनाची अट आहे.तरीपण मांजरसुबा ते डोंगर पिंपळा या रस्त्याच्या दुतर्फा एक ही झाड लावल्याचे व जोपासलेली आढळून येत नाही.गेल्या चार वर्षा पासुन धिम्या गतिने रस्ता बनवनारी एचपीएम कंपनी कुठलीच नियमात काम करत नाही.एचपीएम कंपनी च्या गलथान कारभारा मुळे आज शेकडो जीव जाऊन संसार उघड्यावर आले आहेत.शेकडो लोकांच्या रक्ताने हात बरबटलेली ही कंपनी अजून किती जिव घेणार आहे.गेल्या चार वर्षांत एक ही झाड न लावले न जोपासले,त्यामुळेच आता राष्ट्रीय हरित लवादा कडे न्याय मागण्यात येत आसल्याच वंचित बहुजन आघाडी कडुन सांगण्यात येत आहे.