• Sat. Apr 25th, 2026

एमआयएम चे जिल्हा प्रवक्ते शेख रमीज यांच्या वरील खोटे गुन्हे मागे घ्या:तालेब इनामदार 

Bybaba maske

Dec 16, 2022

एमआयएम चे जिल्हा प्रवक्ते शेख रमीज यांच्या वरील खोटे गुन्हे मागे घ्या:तालेब इनामदार 

रोखठोक वार्ताहर 

अंबाजोगाई येथे 11 डिसेंबर रोजी ट्रव्हल्स मधून लग्नाला जाणाऱ्या मुस्लिम समाजाच्या गाडीला काही युवकांनी गाडी थांबवून चालकाना व मधील मुस्लिम महिलांना शिवीगाळ केली या कारणाने ट्रॅव्हल्स चालकाने सरळ गाडी पोलीस ठाण्यात घेऊन गेला.या घटनेची माहिती भेटल्या नंतर एमआयएम चे नेते रमिज शेख हे पोलीस ठाण्यात गेले व त्या युवकांवर गुन्हा दाखल केला.त्याचा राग मनात धरून रमिज शेख यांच्या वर अंबाजोगाई पोलीस ठाण्यात कलम 324,323,504,506,34 या कलमानुसार खोटी गुन्हे दाखल झाल्याचा आरोप एमआयएम केज शहर अध्यक्ष तालेब इनामदार यांनी केला असून पोलीसांनी खरा तपास करून रमिज शेख यांच्या वरती लावलेले गुन्हे रद्द करावी व खोटी गुन्हे करणाऱ्यावर कारवाई करावी असे निवेदन तहसीलदार केज यांन दिले आहे.अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशाराच दिला आहे.या वेळी बी आर गायकवाड सर, शोभा ताई गायकवाड, मजहर शेख, रईस शेख, अजीम सय्यद, सुमेध गायकवाड, शाहबाज शेख, नाजेम शेख, फिरोज पठाण, इत्यादी उपस्थित होते.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!