• Sat. Apr 25th, 2026

इन्होव्हा मोटारसायकल धडकेत एक ठार 

Bybaba maske

Dec 17, 2022

इन्होव्हा मोटारसायकल धडकेत एक ठार 

रोखठोक वार्ताहर

 तालुक्यातील आनंदगाव (सा) येथील रहिवासी तथा कामानिमित्त औरंगाबाद येथे वास्तव्यास असणाऱ्या तरुणाचा नेकनूर ठाण्याचा हद्दीत अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे

आनंदगाव सारणी येथील रहिवासी श्रीकृष्ण अनिल गायकवाड (30) हा तरुण औरंगाबाद येथे कामानिमित्त वास्तव्यास होता. सदर तरुण हा त्याच्या मोटारसायकल वरून केजकडे येत असताना शनिवारी सायंकाळी गवारी पाटीवर मोटारसायकल व इन्च्होआ गाडीचा अपघात झाला व त्यात त्याला गंभीर मार लागला. त्याला तात्काळ उपचारार्थ नेकनूरच्या दवाखान्यात हलवण्यात आले. परंतु दुखापत गंभीर असल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

दरम्यान, सदरील अपघात नेमका कसा झाला हे स्पष्ट झाले नसून ठाणे प्रभारी विलास हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!