• Sun. Apr 26th, 2026

वाळू उपसा जोमात, महसूल व पोलिस प्रशासन कोमात; शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान

Bybaba maske

Dec 27, 2022

वाळू उपसा जोमात, महसूल व पोलिस प्रशासन कोमात; शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान

रोखठोक न्युज वार्ताहर 

गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेला बेकायदेशीर वाळू वाहतुकीचा व्यवसाय पुन्हा जोमाने सुरू झाला आहे. केज शहर व परिसरातून सध्या दररोज 20 ते 25 ट्रॅक्टरमधून वाळूची खुलेआम बेकायदेशीर वाहतूक केली जात आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे पदाधिकारीही वाळू तस्करीमध्ये सहभागी असल्याने तहसील कर्मचारी व अधिकार्‍यांचेही या वाळू वाहतुकीकडे दुर्लक्ष होत आहे.

केज तालुक्यातील मांजरा नदी,वरपगाव ग्रामीण परिसरात पुन्हा मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैध उपसा केला जात आहे. यामुळे वरपगाव नदीपात्रात मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून ते ग्रामस्थांसाठी जीवघेणे ठरणार आहे.शासनातर्फे वाळू लिलाव बंद असतांना देखील वाळू माफियांतर्फे सुरू असलेल्या या अवैध उपशाकडे स्थानिक पोलीस,तहसीलदार यंत्रणेने हेतुपुरस्पर दुर्लक्ष केले आहे. याप्रश्नी वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष घालून वाळू उपसा थांबवावा.मात्र तहसीलदार व पोलिसांनी वाळू माफियां विरूध्द कोणतीच कारवाई केली नसल्याने त्यांचे वाळू माफियांशी असलेले लागेबांधे दिसून येत असल्याचा आरोप संतप्त ग्रामस्थांनी केला आहे. केज तालुक्यातून मांजरा वरपगाव नदी पात्रातून सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणातील वाळू उपशामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वाळू चोरीमुळे माफियांचे फावले आहे.तर शासनाचा कोट्यवधी रूपयांचा महसूल बुडत आहे.याची दखल घेत त्वरीत वाळू चोरट्यां विरूध्द कारवाई करावी.तालुक्यातील मांजरा नदी, वरपगाव या नदीमधून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू(बोट ने) उपसा करण्यात येतो. केज तालुक्यातील वरपगाव नदीपात्राच्या गावांमधून वाळूची बेकायदेशीर वाहतूक केली जाते. मांजरा,वरपगाव या गावांमधून खुलेआम वाळू उपसा होत असतानाही तलाठी, मंडळ अधिकारी व तहसीलदार यांचे या प्रकाराकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे. वेगवेगळ्या गावांमधून तब्बल 20 ते 25 ट्रॅक्टरमधून ही वाळू वाहतूक होत आहे. महसूल अधिकार्‍यांनी कारवाई करू नये, यासाठी वाळूतस्कर पूर्ण काळजी घेताना दिसत आहेत. वाळूतस्करांनी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळूचा उपसा केला असल्याने नदीपात्रात ठिकठिकाणी मोठे खड्डे पडलेले आहेत.

तालुक्यात वाळूतस्करांची खास यंत्रणा सर्वपरिचित आहे. अधिकार्‍यांवर लक्ष ठेवण्यासाठी या तस्करांनी काही युवकांची मानधनावर नियुक्ती केली आहे. महसूल खात्याचे अधिकारी व कर्मचार्‍यांच्या हालचालीकडे लक्ष ठेवण्याची जबाबदारी या युवकांना देण्यात आलेली असते. तहसीलदार कोठे जातात? याचा अंदाज हे युवक घेतात. तहसीलदार अथवा तहसील कार्यालयातील कर्मचारी कारवाईसाठी येत असल्याची माहिती मिळताच ते वाळू वाहतूक करणार्‍या चालकांना याची माहिती देतात. यामुळे अधिकारी पोहोचणे अगोदरच वाळूचे ट्रॅक्टर गायब झालेले असतात. तहसीलदारांनी बेकायदेशीर वाळू उपशात लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे.

चौकट:-

शहरात गेल्या काही दिवसांपासून बेकायदेशीर वाळू वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. वाळू तस्करां बरोबरच काही पक्षांचे पदाधिकारी आता वाळूतस्कर बनले आहेत. यातील एकाचे दोन ट्रॅक्टर सध्या सुरू आहेत. पदाधिकारीच वाळू तस्कर बनल्याने शहरात हा चर्चेचा विषय बनला आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!