ज्याच्यावर असेल सरपंचाची मर्जी त्यालाच मिळणार उपसरपंचाची खुर्ची !
निर्णायक मतामुळे बहुमत असणारा नव्हे तर सरपंचाच्या मर्जीतीलच उपसरपंच होणार !
उपसरपंच होण्यासाठी बहुमत नव्हे तर हवी सरपंचाची मर्जी !
गौतम बचुटे/केज :- उपसरपंच जरी नावापूरते पद असले आणि त्याला काही अधिकार नसले; तरी मात्र गावात मिरविण्यासाठी ते असते. जर सरपंच अधिकृत रजेवर गेले आणि गैरहजर असले तर सभा चालविण्यासाठी उपसरपंचाला अधिकार असतात. म्हणून सरपंचाच्या खालोखाल या पदाला प्रतिष्ठा आहे.
थेट निवडणुकीतून निवडून आलेल्या सरपंचाला आता उपसरपंच निवडीत विशेष अधिकार प्राप्त झाले आहेत. सभागृहा बाहेर जरी उपसरपंच पदासाठी इच्छूक असलेल्याना साधे बहुमत असले तरी त्याला उपसरपंच पदाची खुर्ची मिळणार नाही. कारण आता उपसरपंचाच्या निवडणुकीत सरपंचाना पहिल्या फेरीत मतदानाचा हक्क प्राप्त झाला असून समसमान मते पडल्यास पुन्हा निर्णायक मत देण्याचा अधिकार बहाल करण्यात आला आहे. या मुळे सरपंचांना उपसरपंच निवडीत दोन मतांचा अधिकार प्राप्त झाला असल्याने एकाच गटातील दोन इच्छुकां पैकी आता सरपंचाचे अधिकचे मत कुणाला मिळेल? ज्याच्यावर सरपंचाची मर्जी आणि कृपाशिर्वाद असेल. जो कामा पेक्षा जास्त तिखट असणार नाही; तोच उपसरपंचपदी विराजमान होणार आहे.