• Sun. Apr 26th, 2026

आमदार संगीताताई ठोंबरे यांच्या सुतगिरणीच्या टान्सफार्मर मधून 5 लाख 60 हजाराच काॅपर चोरीस गेले.

Bybaba maske

Dec 29, 2022

आमदार संगीताताई ठोंबरे यांच्या सुतगिरणीच्या टान्सफार्मर मधून 5 लाख 60 हजाराच काॅपर चोरीस गेले.

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज तालुक्यातील लव्हुरी येथील लोकनेते गोपीनाथ मुंडे मागासवर्गीय सुतगिरणीने स्वखर्चातून बसविलेल्या विद्युत ट्रान्सफर्मारमधील ५ लाख ६० हजार रुपये किंमतीच्या कॉपर कॉइल्स, केबल व इतर कॉपर साहित्य अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

        केज तालुक्यातील लव्हुरी येथे माजी आमदार प्रा. संगीता ठोंबरे यांच्या ताब्यात असलेल्या लोकनेते गोपीनाथ मुंडे मागासवर्गीय सुतगिरणीचे काम सुरू आहे. सुतगिरणीला विद्युत पुरवठा करण्यासाठी इस्लामपूर ( ता. मिरज जि. सांगली ) येथून पॉवर ट्रान्सफर्मार व इतर साहित्य सुतगिरणीने स्वखर्चातून खरेदी करून डिसेंबर २०२१ या महिन्यात सूतगिरणीच्या मुख्य इमारतीच्या मागील बाजूस ईलेक्ट्रीक विभागात बसवले होते. मात्र सदरील ट्रान्सफार्मरला विद्युत प्रवाह दिलेला नव्हता, म्हणून ते बंद स्थितीत होते. तर ७ डिसेंबर रोजी कार्यकारी संचालक अनिल पाखरे व अकाऊटंट विठ्ठल मुळे यांनी तपासणी केली असता ते सुस्थितीत होते. मात्र त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी विद्युत प्रवाह बंद असल्याची संधी साधून या ट्रान्सफर्मारमधील ५ लाख ६० हजार रुपये किंमतीच्या ६ कॉपर कॉइल्स, ८०० किलो वजनाचे एपीएफसी पॅनलमधील कॉपर साहित्य व केबल असे साहित्य चोरून नेल्याचे २८ डिसेंबर रोजी दुपारी उघडकीस आले. अकाऊटंट विठ्ठल मुळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास जमादार उमेश आघाव करताहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!