आधंळ्या प्रशासना मुळे अतिक्रमण धारक झाले मुजोर.नगरपंचायत च्या सत्ताधाऱ्यांचा व प्रशासनाचा मुक पाठींबा आहे का?
रोखठोक न्युज वार्ताहर
केज शहरात कोणाचीच वचक नसल्याने सरकारी जागेत अतिक्रमण करणाऱ्याचे फावत आहे.तालुक्यातील तहसीलदार,नगरपंचायत चे मुख्याधिकारी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी,फलोत्पादन चे तालुका अधिकारी यांचे आपल्या मोक्याच्या जागेवर झालेले अतिक्रमण व होत असलेले अतिक्रमण याच्या वर बिल्कूल लक्ष नाही.त्या मुळे केज शहराची बकाल अवस्था झाली आहे.तहसीलदार,नगरपंचायत चे मुख्याधिकारी,यांच्या नाकावर टिच्चून राज रोष टोलेजंग अतिक्रमित जागेत बिल्डिंग बांधल्या जात आहेत.दिसेल तिथे अतिक्रमण केले जात आहे.समर्थ नगर वकिलवाडी येथे चिटकून फलोत्पादनाची जागा आहे,तिकडे भुमाफियांचा डोळा गेला आणि रात्रीतच साफसफाई,शेड ठोकण्यास चालु झाले.पण त्या भागातील सतर्क नागरिकाकडून हा डाव हाणून पाडला पण त्यांच्या दादागिरीला व धमक्याना त्याना सामोरे जावा लागत आहे.त्या मुळेच त्या भागातील नागरिकाकडून तहसील, पोलीस स्टेशन ला निवेदन देऊन हे अतिक्रमण तात्काळ थांबविण्याची विंनती केली आहे नसता आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल असे निवेदन द्वारे इशारा देण्यात आले आहे.केज नगरपंचायत ची सत्तांतर झाल्या पासुन अतिक्रमण धारकांची दादागिरी वाढत चालली आहे.बांधकाम परवाने नसताना नगरपंचायतच्या हद्दीत बांधकाम कसे होत आहे हा नागरिकाकडून प्रश्न चर्चिला जात आहे.यास नगरपंचायत प्रशासनाचा व सत्ताधाऱ्यांचा मुक पाठींबा तर नाहीना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
तळटीप.केज शहरातील महामार्गावरील सोन्याचा भाव असणारी जमीन ही वेगवेगळ्या सरकारी खात्या अंतर्गत येते पण त्या सर्व जागांवर अतिक्रमण आहे.आणि हे अतिक्रमण थोड्या लोकांच्या मालकीचे आहे.या लोकांनी जागा अतिक्रमित करून त्यावर गाळे टाकून किरायाने दिले आहेत.हे सर्व प्रतिष्ठित आहेत.किंवा कोणा राजकीय नेत्याचे बगल बच्चे आहेत त्या मुळेच यांच्यावर कारवाई होत नाही.