• Fri. Jun 5th, 2026

केज अंबाजोगाई रस्त्यावर भीषण अपघात! प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला अलिशान कारची धडक एक ठार आठ जखमी

Bybaba maske

Jan 10, 2023

केज अंबाजोगाई रस्त्यावर भीषण अपघात! प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला अलिशान कारची धडक एक ठार आठ जखमी

रोखठोक न्युज वार्ताहर

येथून केज तालुक्यातील दिपेवडगावकडे प्रवासी घेऊन जात असलेल्या अप्पे रिक्षाला फॉर्च्युनरची जोरदार धडक बसून घडलेल्या भीषण अपघातात एक ठार तर आठजण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी ( दि. १० ) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अंबाजोगाई-केज रस्त्यावर लोखंडी सावरगाव येथील पेट्रोल पंप जवळ घडली आहे. जखमींना अंबाजोगाई येथे स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, अंबाजोगाई येथून दिपेवडगाव ( ता. केज ) येथे अप्पे रिक्षा प्रवासी घेऊन जात होता. दरम्यान तो लोखंडी सावरगाव येथील पेट्रोल पंप जवळील पुलाच्या बाजूला थांबला होता.‌ यावेळी लातूर कडून फॉर्च्युनर भरधाव वेगात आली. ती सरळ अप्पे रिक्षावर धडकून भीषण अपघात घडला. या अपघातात रिक्षातील सुनील रामभाऊ कदम ( वय ४० वर्ष ) रा. दिपेवडगाव हे जागीच ठार झाले. तर रिक्षातील इतर प्रवाशी गंभीर जखमी झाले. जखमी मध्ये चार महिला व चार पुरुषांचा समावेश असल्याचे समजते. घटना घडताच उपस्थितांनी धाव घेत अपघात ग्रस्तांना मदत केली. १०८ नंबर डायल करुन रुग्णवाहिका बोलावून जखमींना तातडीने अंबाजोगाई येथे स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जखमीवर येथे उपचार सुरू आहेत. धडक बसताच फॉर्च्युनर चालकाने वाहनासह घटनास्थळावरून पसार होत सरळ युसुफ वडगाव पोलीस ठाणे गाठले. पोलीसांनी चालक व वाहन ताब्यात घेतले आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!