• Sun. Jun 21st, 2026

गेल्या आठ महिन्यांपासून नगरपंचायत ची अनामत रक्कम न भरताचा. मंगळवार,शुक्रवार च्या बाजाराची अनाधिकृत रक्कम वसूली.हा झिजीया कर कुणाच्या खिशात जातोय?

Bybaba maske

Feb 21, 2023

गेल्या आठ महिन्यांपासून नगरपंचायत ची अनामत रक्कम न भरताचा. मंगळवार,शुक्रवार च्या बाजाराची अनाधिकृत रक्कम वसूली.हा झिजीया कर कुणाच्या खिशात जातोय?

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज शहरात मंगळवार व शुक्रवार असे दोन बाजार भरतात,त्यांना नगरपंचायत मार्फत सुख सुविद्या पुरवण्या साठी प्रत्येक बाजारा भाजी पाला किंवा तत्सम गोष्टी विकण्या साठी नगरपंचायत कर वसुली करते.त्याच टेंडर प्रत्येक वर्षी बोली लावून काढले जाते हा नित्यक्रम प्रतेक वर्षी चालतो पण या वर्षी नगरपंचायत ने टेंडर काढले पण कुणाला दिले हे गुलदस्त्यात ठेवले, ठेवले तर ठेवले पण प्रत्येक वर्षी टेंडर धारका कडून काही रक्कम नगरपंचायत कडे अनामत म्हणून ठेवली जाते.पण गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून नगरपंचायत ने टेंडर तर काढले पण ना अनामत रक्कम भरून घेतली ना किती जनाने टेंडर घेतले हे उघड केले नाही.कारण दोन व्यक्तीने मंगळवार व शुक्रवार असे दोन्ही बाजार वाटून घेतले आहेत.रक्कम तर जमा करत आहेत पण कुणा साठी? हा प्रश्न अनुत्तरित आहे. कारण दोघेही नगरपंचायत कडे हा भरणा करत नाहीत किंवा वर्ष भरा साठी जी अनामत रक्कम भरली जाते ती भरली गेली नाही.मग नेमकी रक्कम कोणाच्या खिशात गेल्या दहा महिन्यांपासून जाते हे न उलघडणारे कोडेच आहे.मग यात नगरपंचायत चे सत्ताधारी का प्रशासन जबाबदार आहे, कसे शोधायचे?कारण कष्टकरी शेतकरी, व्यापारी यांचा खिसा राज रोष पणे मारला जातोय याचे गुन्हेगार कोण? असे नागरिकात,व्यापाऱ्यांकडून व शेतकरी भाजी पाला विक्रत्या कडून प्रश्न विचारला जात आहे!!!

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!