• Wed. Apr 22nd, 2026

शाम काळे जळीत प्रकरणात व्याजाच्या रक्कमे तुन घडला प्रकार,व्याज दे नाहीतर घर नावावर कर यातून घडला प्रका

Bybaba maske

Feb 20, 2023

 

शाम काळे जळीत प्रकरणात व्याजाच्या रक्कमे तुन घडला प्रकार,व्याज दे नाहीतर घर नावावर कर यातून घडला प्रकार.

रोखठोक न्युज वार्ताहर 

 

गौतम बचुटे/केज :- केज येथे दि. २० फेब्रुवारी रोजी सकाळी ११:०० ते १२:०० वा च्या दरम्यान एका कर्मचाऱ्याने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतलेल्या घटनेतील ताजी माहिती, की,

शाम भाऊराव काळे हा उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून सेवा करीत आहे. शाम काळे याने एक २४ जानेवारी रोजी महिन्यां पूर्वी दादा मुंडे आणि सचिन सलगर यांच्या कडून विजय जावळे यांच्या घरात १०% व्याजाने ३ लाख रु. व्याजाने घेतले होते. त्या बदल्यात शाम काळे याला ते तिघेजण त्याचे घर त्यांच्या नावावर लिहून दे. अशी मागणी करीत होते. म्हणून शाम याने दि. १८ फेब्रुवारी त्यांना स्टॅम्प पेपरद्वारे स्वतःचे रहाते घर लिहून दिले होते.

दरम्यान दि. २० फेब्रुवारी रोजी सकाळी १०:०० च्या दरम्यान दादा मुंडे, सचिन सलगर आणि विजय जावळे यांनी त्याला कॉलेजवर जाऊन बळजबरीने त्यांच्या चारचाकी गाडीत बसविले. त्यावेळी शाम हा त्याच्या दुचाकीच्या बाटलीत आणलेले पेट्रोल टाकीत होता. ते अर्धे बाटली भरलेली पेट्रोल त्याजवळ असताना बाटलीसह तिघांनी त्याला बळजबरीने गाडीत बसवून आता घराची रजीष्ट्री आमच्या नावाने करून दे म्हणून दबाव टाकला आणि शाम काळे याला ते तिघे केजकडे घेऊन आले. त्यांच्या त्रासाला कंटाळून व वैफल्यातुन शाम याने काळे याने केजवळ आल्या नंतर गाडी थांबताच अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेतले.

शाम याची प्रकृती चिंताजनक असून व्याजाच्या पैशात घर जाण्याच्या भीतीने शाम याने स्वतः आत्मदहन केले.

या बाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि पोलीस नाईक त्रिंबक सोपणे यांनी जखमी शाम काळे याचा स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील जळीत वार्डात जबाब नोंदवून घेतला आहे. शाम काळे हा ९०% भाजला असून याची पृकृती चिंताजनक आहे.

baba maske

Related Post

ऽऽबस झाल्या घोषणांच्या रिकाम्या तुताऱ्या; आता हव्यात कार्यान्वित मुताऱ्या..! “सामुदायिक मूत्रविसर्जन” आंदोलनाची चर्चा जोरात
केज नगरपंचायतीचे दुर्लक्ष; नागरिकांना मोकाट कुत्र्यांच्या तावडीत सोडल्याचा आरोप. पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्याला १० दिवस उलटले; अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना नाही. कुत्र्याने ४० नागरिकांवर हल्ला करत अनेकांना जखमी केले होते
केजमध्ये ‘बुद्धंम शरणम् गच्छामि’ संगीतमय महानाट्याचे भव्य आयोजन फुले-आंबेडकर जयंतीनिमित्त नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन – भाई मोहन गुंड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!