केज येथे हायवेवर थरार.!गाडीतून उतरून स्वतःच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून पेटवून घेतले
रोखठोक न्युज
गौतम बचुटे/केज :- केज येथे सकाळी ११०० वा च्या सुमारास उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील एका कर्मचाऱ्याने गाडीतून उतरून भर रस्त्यावर अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत स्वतःला पेटवून घेतले. त्या नंतर त्याच्या सोबतचे दोघे पळून गेले आहेत.
या बाबतची माहिती अशी की, सोमवार दि. २० फेब्रुवारी रोजी सकाळी ११:०० वा. च्या सुमारास शाम काळे हे एका चार चाकी गाडीने केजकडे येत असताना केज बीड रोडवरील शिक्षक कॉलनी जवळच्या थोरात यांच्या बंद असलेल्या धाब्या जवळ गाडी थांबवून खाली उतरला. त्या नंतर त्यांनी एका प्लॅस्टिकच्या बाटलीतील पेट्रोल सदृश्य ज्वलनशील पदार्थ स्वतःच्या अंगावर ओतून घेऊन पेटवून घेतले. त्याच्या कपड्याने पेट घेताच रस्त्यावरील पाहणाऱ्या लोकांनी एका हॉटेल मधून पाण्याचा जार आणून पाणी ओतून आग विझवली. त्या नंतर त्याच्या सोबत असलेले इसम पळून गेले.
शाम काळे हा सुमारे चाळीस टक्के भाजला असून शाम काळे हा उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील मोहेकर महाविद्यालयात प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून सेवा करीत आहे.
या घटनेचे कारण अद्याप समजले नसून घटनेची माहिती मिळताच केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या आदेशा वरून पोलीस नाईक मतीन शेख, महावीर सोनवणे, संतोष गित्ते आणि रुकमानंद घोलप हे घटनास्थळी रवाना झाले. पोलिसांनी जखमी शाम काळे याला उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालय महाविद्यालय येथे सरकारी दवाखाण्यात हलविले आहे.