सपोनि योगेश उबाळे यांची ड्राय-डेला चंदनसावरगाव आणि धनेगाव फाटा येथे धाड
रोखठोक न्युज
गौतम बचुटे/केज :- युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे यांनी अवैद्य दारू विक्री करीत असलेल्या दोन ठिकाणी कारवाई केली आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस ठाणे हद्दीत धनेगाव फाटा आणि चंदन सावरगाव येथे अवैद्यरित्या दारू विक्री होत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे यांना मिळताच दि. १९ फेब्रुवारी रोजी त्यांनी आपल्या अधिनिस्त अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. आदेश मिळताच पोलीस हवालदार रंगनाथ राठोड यांनी चंदनसावरगाव बसस्थानक येथील शिवनेरी हॉटेल समोरील रोडवर पान टपरीमध्ये ऋषिकेश नरेंद्र तपसे हा विनापरवाना बेकायदेशिर रित्या देशी दारु ताब्यात बाळगुन तिची चोरटी विक्री करीत असल्याचे आढळून आले. पोलीसांनी ऋषीकेश तपसे याला मुद्देमालासह ताब्यात घेतले.
तसेच धनेगाव फाटा येथील हॉटेल सरकारमध्ये सोमनाथ शिवाजी वैरागे हा विनापरवाना बेकायदेशिररित्या देशी विदेशी दारू जवळ बाळगुन तिची चोरटी विक्री करीत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे याना मिळताच त्यांनी पोलीस हवालदार रावसाहेब गणपतराव मुंडे यांना कारवाईचे आदेश दिले. आदेश मिळताच पोलीस हवालदार रावसाहेब मुंडे यांनी धनेगाव फाट्यावरील हॉटेल सरकारवर धाड टाकली. त्या वेळी सोमनाथ शिवाजी वैरागे हा अवैद्यरित्या दारू विक्री करीत असल्याचे आढळून आला. पोलिसांनी त्याला मुद्देमालासह ताब्यात घेतले.
या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली दोघांवर महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम कलम ६५ (ई) नुसार गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे.