• Sun. Jun 21st, 2026

अनुसूचित जाती साठी सरपंच पद म्हणून संरपच निवडला नाही.दोन वर्षांपासून रिक्त पद,उपसरपंच बोली लावून हक्तय पद, पंचायत समिती,गटविकास आधिकारीच झोपेत.  

Bybaba maske

Feb 22, 2023

अनुसूचित जाती साठी सरपंच पद म्हणून संरपच निवडला नाही.दोन वर्षांपासून रिक्त पद,उपसरपंच बोली लावून हक्तय पद, पंचायत समिती,गटविकास आधिकारीच झोपेत.

रोखठोक न्युज वार्ताहर 

 

सविस्तर वृत्तांत असा की केज   तालुक्यातील आंधळेवाडी येथील पहिली बैठक घेतली त्याला १७ / ०२ / २०२१ रोजी झाली आता दोन वर्षे आणी विशेष बाब म्हणजे येथील सरपंच पद हे राखीव प्रवर्गासाठी असतानाही याठिकाणी एकही जागा राखीव नाही . विशेष म्हणजे अजून दोन गावातही अशीच परिस्थिती असल्याचे समजते.

१५ जानेवारी २०२१ रोजी आंधळेवाडी ग्रामपंचायतची निवडणूक झाली त्यावेळी येथील सरपंच पद हे अनुसुचित जाती राखीव प्रवर्गासाठी राखीव होते विशेष बाब म्हणजे ज्यावेळी निवडणूक झाली तेव्हा सात जागासाठी निवडणूक झाली यामधे एकही जागा अनुसुचित जाती साठी राखीव नव्हती यामधे सर्वसाधारण स्त्री यासाठी तीन आंधळे मिराबाई वसुदेव , आंधळे रत्नमाला नवनाथ , आंधळे राधाबाई जोतीराम , आंधळे नामदेव तात्याभाऊ व आंधळे महादेव उत्तम  सर्वसाधारण प्रवर्गातून बिनविरोध निवडून आले तर नागरिकांचा मागास प्रवर्ग मधून आंधळे झुंपाबाई नामदेव व आंधळे लक्ष्मीबाई दादाराव यांच्या बिनविरोध निवडी झाल्या यामधे गावात अनुसुचित जातीची घरे असतानाही अनुसुचित जातीसाठी एकही जागा राखीव करण्यात आली नाही व त्यामुळे अनुसुचित जाती साठी राखीव असलेले सरपंच पद हे राखीवच राहीले येथील सरपंच पदाचा कारभार हे उपसरपंच आंधळे नामदेव तात्याभाऊ हे बिनधास्त पणे पाहत आहेत . नागरिकांत अशी चर्चा आहे की गावकी चा कारभार बोली लावून काही लाखात ठरला असल्यामुळे येथील कारभार उपसरपंच नामदेव आंधळे यांच्या कडे सुपुर्द करण्यात आला. १७ फेब्रुवारी २०२१ रोजी ग्रामपंचायतची पहिली बैठक झाली परंतु लोकशाही टिकविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व प्रवर्गाना या पदाचा लाभ मिळायला हवा असतानाही हे पद रिक्तच ठेवून लोकशाही च्या चिंधड्या उडवल्या गेल्या विशेष बाब म्हणजे पंचायत समितीच्या पंचायत विभागाला याची चौकशी केली असता त्यांना या प्रकाराची माहिती नाही असे सांगितले त्यांच्या कडे फक्त पहिली सभा व शेवटची सभा एवढाच उल्लेख आढळला . घटनेनुसार सहा महिन्याच्या वर पद रिक्त ठेवायाचे नसते परंतु याबाबतीत पंचायत समितीच्या पंचायत विभागाने ही माहितीच तहसीलच्या निवडणूक विभागाला दिली नाही त्यामुळे दोन वर्षे झाली तरी सरपंच पद रिकामेच आणी उपसरपंचच हाकत आहेत गावचा कारभार .

याबाबतीत गटविकास अधिकारी राजेंद्र मोराळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!