मागासवर्गीयांच संरपच पदाचा हक्क डावलणार्या शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी!! ही माहिती गेल्या दोन वर्षांत निवडणूक आयोगास का कळवली नाही?
मागासवर्गीयांच संरपच पदाचा हक्क डावलणार्या शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी!! ही माहिती गेल्या दोन वर्षांत निवडणूक आयोगास का कळवली नाही?
रोखठोक न्युज वार्ताहर
केज तालुक्यातील आंधळेवाडी ग्रामपंचायत निवडणूक झाली त्यावेळी सरपंच पद हे अनुसुचित जाती साठी राखीव प्रवर्गा साठी राखीव होते,विषेश बाब म्हणजे ज्या वेळेस निवडणूक झाली,या मध्ये एक ही जागा अनुसुचित जाती साठी राखीव नव्हती,यामध्ये सर्वसाधारण स्त्री या साठी तीन जागा आरक्षित करण्यात आलेया त्या मध्ये आंधळे मिराबाई, आंधळे रत्नमाला,आंधळे राधाबाई, व पुरुष प्रवर्गात आंधळे नामदेव हे व इतर तत्सम उमेदवार निवडून आले पण गावात मागासवर्गीय समाज असतानाही वार्ड रचना करणारे संबंधित आधिकारी व कर्मचारीवर्गानी अनुसुचित जाती साठी एक ही मतदार संघ आरक्षित केला नाही.त्यामुळे नागरिक मागास प्रवर्गातून व सर्वसाधारण प्रवर्गातून आरक्षित जागेतून निवडणूक झाली व सभासद निवडणूक आले पण ज्या सरपंच पदा साठी जागा आरक्षित होती त्या अनुसुचित जातीच्या प्रवर्गा साठी जाग आरक्षित होती ती जागाच सोडली गेली नसल्या कारणाणे ती सरपंच पदाची जागा रिक्त राहीली.त्यावर कहर म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून संरपच पद रिक्त आहे.निवडणुक आयुक्तांनी सरपंच पदाची निवडणूक घेण्याचे आदेशित असताना आंधळेवाडी मध्ये सरपंच पदाची निवडणूक झालीच नाही.फक्त उपसरपंचाची निवडणूक घेतली व आजतागायत आंधळे वाडी ग्रामपंचायत चा कारभार उपसरपंच पहात आहे.याचा थांगपत्ता ही शासकीय यंत्रणेला गेल्या दोन वर्षांपासून लागला नाही. किंवा ही बाब निवडणूक आयोगास कळवली किंवा नाही? आता यावर प्रशासन व जिल्हाधिकारी काय भुमीका घेतात असा प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे.लवकरच जिल्हाधिकाऱ्यांसह, विभागीय आयुक्तताना या बदल निवेदन देऊन संबंधित कर्मचारीवर्गावर कारवाई करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष बाबासाहेब अंबादास मस्के यांनी केले आहे.