मोटारसायकल व ऊस वाहतुक करणारी बैलगाडीचा धडक एक गंभीर जखमी
रोखठोक न्युज वार्ताहर
केज पासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या केज बीड रोडवरील डोणगाव फाट्यावर मोटरसायकल ऊस वाहतुक करणारी बैलगाडी चा अपघात झाला आहे. सदरील मोटर सायकलस्वार गंभीर जखमी झाला असून डोक्याला गंभीर इजा झालेली आहे.
गुरुवारी सायंकाळच्या वेळेला जाधव जवळा याकुब शेख हे दुचाकी वर चाललेले असताना त्यांच्या मोटर सायकल ला ऊस वाहतुक करणारी बैलगाडी ची धडक बसली. आणि त्यामध्ये याकुब शेख हे गंभीर जखमी झालेले आहेत. सदरील अपघाताची माहिती मिळताच उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर शाकेर शेख आणि रुग्णवाहिकेचे पायलट ए. एस. मुंडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन सदरील जखमी इसमास केजच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल केलेले आहे. शेख यांच्या डोक्याला मार लागला असून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झालेला आहे. सदरील अपघात नेमका कोणत्या वाहनाबरोबर झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही.