• Wed. Apr 22nd, 2026

अबब आहो एक नव्हे तर सहा ग्रामपंचायतीला संरपच नाही!!!केज तालुक्यातील सहा ग्रामपंचायती वर ग्रामसेवक,उपसरपंचा ला हाताशी धरून गटविकास आधिकारी राजवट.

Bybaba maske

Feb 24, 2023

अबब आहो एक नव्हे तर सहा ग्रामपंचायतीला संरपच नाही!!!केज तालुक्यातील सहा ग्रामपंचायती वर ग्रामसेवक,उपसरपंचा ला हाताशी धरून गटविकास आधिकारी राजवट.

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज तालुक्यातील सहा अश्या ग्रामपंचायत आहेत ज्या 2021 मध्ये निवडणुका होऊन ही फक्त अनुसुचित जाती साठी राखीव होत्या पण जरी सरपंच पद हे अनुसुचित जाती साठी आरक्षित होत पण त्या साठी जी वार्ड रचना झाली होती,त्या वार्ड रचनेत वार्ड हा अनुसुचित जाती साठी राखीव ठेवलाच नाही.त्यामुळे या सहा ग्रामपंचायत ची निवड झाली पण अनुसुचित जाती साठी कुठलाही वार्ड राखीव नसल्या मुळे किंवा अनुसुचित जातीचा उमेदवार हा निवडून आल्या नसल्या कारणाणे सरपंच पद हे रिक्त राहीले.गेल्या दोन वर्षांपासून उपसरपंच व ग्रामसेवक यांच्या माध्यमातून पंचायत समितीचे गटविकास आधिकारी हे पद चालवत आहेत.जसे राष्ट्रपतींकडून राष्ट्रपती राजवट लागू केली जाते आणि राज्यपाल राज्य चालवतो तशी या सहा ग्रामपंचायत ची सत्ता ही उपसरपंच व ग्रामसेवक यांच्या मार्फत गटविकास आधिकार चालवत आहेत.शंका घेण्या साठी कारण असे की 2021 नंतर दोन वर्षांपासून त्यानी सरपंच पदाच्या रिक्त पदाचा कोणता ही पाठ पुरवठा निवडणूक आयोगास केला,असे कुठेच आढळून आले नाही.तसेच उपसरपंच नेमणूक करूण त्या गावचा वार्षिक आराखडा मंजूर करून ग्रामसेवक व उपसरपंचा बरोबर हातमिळवणी करून सहा ग्रामपंचायत चा गावगढा चालवला.अनुसुचित जाती साठी राखीव असलेल्या पदावर जर जागा आरक्षित झाली नाही.व एखादा अनुसुचित जातीचा उमेदवार निवडला जात नसेल तर अश्या परिस्थितीत निवडणुक आयोगाचे मार्गदर्शन घेणे योग्य असताना.निवडणूक आयोगाच्या जिआर चा गैरवापर करून दोन वर्षांपासून अनुसुचित जाती साठी सुटलेले सरपंच पद रिक्त ठेऊन उपसरपंच व ग्रामसेवक यांच्या माध्यमातून गटविकास आधिकारी यानी कारभार केला असे जनतेत बोलले जात आहे.तरी याची सविस्तर चौकशी करावी अशी मागणी आता वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष बाबासाहेब अंबादास मस्के यांच्या कडून केले जात आहे.

baba maske

Related Post

ऽऽबस झाल्या घोषणांच्या रिकाम्या तुताऱ्या; आता हव्यात कार्यान्वित मुताऱ्या..! “सामुदायिक मूत्रविसर्जन” आंदोलनाची चर्चा जोरात
केज नगरपंचायतीचे दुर्लक्ष; नागरिकांना मोकाट कुत्र्यांच्या तावडीत सोडल्याचा आरोप. पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्याला १० दिवस उलटले; अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना नाही. कुत्र्याने ४० नागरिकांवर हल्ला करत अनेकांना जखमी केले होते
केजमध्ये ‘बुद्धंम शरणम् गच्छामि’ संगीतमय महानाट्याचे भव्य आयोजन फुले-आंबेडकर जयंतीनिमित्त नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन – भाई मोहन गुंड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!