• Fri. Apr 24th, 2026

केळगांव/बेलगांव येथे रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी १७ सदस्सीय समित गठीत.पंचनामा करण्या साठी आधिकारी गावात दाखल.

Bybaba maske

Feb 27, 2023

केळगांव/बेलगांव येथे रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी १७ सदस्सीय समित गठीत.पंचनामा करण्या साठी आधिकारी गावात दाखल.

रोखठोक न्युज वार्ताहर 

बेलगांव/केळगाव येथे २०१० ते २०२० दरम्यान मंजूर झालेल्या १२५ विहीरी व १२ रस्ते यांची कामे न करताच निधी लाटल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते प्रताप दातार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांना निवेदन दिले असून २८ फेब्रुवारी रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर अमरण उपोषण करणार असल्याचे सांगितले आहे.

तक्रारीतील सर्व कामांची १२ रस्ते व १२५ विहिरी ची तपासणी करून चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी गठीत केलेल्या १७ सदस्सीय समितीस दिले आहेत.वरील सर्व विस्तार अधिकारी (पं.), सहाय्यक कार्यक्रम अधिकारी व तांत्रीक सहाय्यक सिव्हील / कृषी यांनी तात्काळ दिनांक 27/02/2023 रोजी ग्रामपंचायत बेलगाव / केळगाव ता. केज येथे जाऊन तक्रारीतील नमुद सर्व कामाची व अभिलेख्याची तपासणी करुण चौकशी अहवाल विनाविलंब या कार्यालयास सादर करावा.

या कामी हयगय कुचराई केल्यास तसेच अहवाल उशीरा अथवा स्वयंस्पष्ट न दिल्यास आपणाविरुध्द नरेगा कायदयातील तरतुदीनुसार प्रशासकिय कार्यवाही अवलंबली जाईल.असे आदेशीत केले आहे.

आज दी.२७ फेब्रुवारी रोजी १७ सदस्सीय समिती तपासणी करण्यास बेलगांव/केळगांव येथे गेले असता जुन्याच विहिरी दाखवून सर्वे करायला सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!