शेतातील ज्वारी काढणाऱ्याला जाब विचारला म्हणून बापलेकाला दगडाने मारहाण होळमध्ये तिघा विरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
रोखठोक न्युज
गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील होळ येथील सेवानिवृत्त शिक्षक यांच्या शेतातील ज्वारी अन्य कोणी कापणी करून घेऊन जात असताना त्यांनी जाब विचारला म्हणून शेत मालक आणि त्याच्या मुलाला दोन भावांनी दगडाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात दोघा विरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.
या बाबतची प्राप्त माहिती अशी की, केज तालुक्यातील दत्तात्रय राणोजी सरवदे हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. त्यांना होळ येथील शिवारात १४३ २/अ/१ या सर्व्हे नंबर मध्ये जमीन आहे. सन १९९९ मध्ये त्यानी ही जमीन बाळासाहेब रामकीसन घुगे यांच्या कडून खरेदी केली होती.
दि. २४ फेब्रुवारी रोजी दत्तात्रय सरवदे व त्यांचा मुलगा प्रवीण सरवदे हे शेतातील ज्वारीचे पीक काढणीसाठी शेतात मजूर येणार होते. म्हणून शेतात गेले असता त्यांना होळ येथील हनुमंत दिगांबर घुगे, मिरा हनुमंत घुगे, कविता लक्ष्मण घुगे हे तिघे त्यांच्या परस्पर पीक कापणी करीत असताना दिसून आले. म्हणून दत्तात्रय सरवदे यांनी त्यांना तुम्ही का पीक कापणी करता? असे विचारताच हनुमंत घुगे याने त्याचा भाऊ लक्ष्मण घुगे यास फोन करून शेतात बोलावून घेतले. त्यांनी दत्तात्रय सरवदे व त्याचा मुलगा प्रवीण सरवदे यास जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. लक्ष्मण घुगे याने दत्तात्रय सरवदे यांना आणि प्रवीण सरवदे या दोघा बाप-लेकाला दगडाने मारहाण केली. मारहाणीच्या भीतीने दत्तात्रय सरवदे व प्रवीण सरवदे हे त्यांना घाबरून मोटार सायकल वरून पळून गेले आणि युसुफवडगाव पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती दिली. त्या नंतर त्यांनी अंबाजोगाई येथील सरकारी दवाखान्यात उपचार घेऊन सुट्टी झाल्या नंतर युसुफवडगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी नुसार हनुमंत घुगे व त्याचा भाऊ लक्ष्मण घुगे यांच्या विरुद्ध गु. र. नं. ३९/२०२३ भा. दं. वि. ३२४, ५०४, ५०६, ३४ आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार अधिनियम (ॲट्रॉसिटी) ३ (१) (आर), ३ (१) (एस), ३ (२) ( व्हीए) नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
त्याचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत हे करीत आहेत.
——————————————–
काय आहे जमीन प्रकरण :- सदर जमिनीच्या मालकी हक्का बाबत घुगे आणि सरवदे यांच्यात केज न्यायालयात दिवानी दावा क्र. ४९४/२०१८ असा वाद चालु आहे. परंतु ही वादग्रस्त जमीन दत्तात्रय सरवदे यांच्या ताब्यात आहे. घुगे यांना न्यायालयाने मनाई हुकूम दिलेला नसतानाही त्यांनी आगळीक केली आहे.