• Fri. Apr 24th, 2026

केज नगरपंचायत चा प्रताप:आपल्या मर्जीतील गुत्तेदाराला साभाळण्या साठी निवेदा व किंमत केल्या गायब.

Bybaba maske

Feb 26, 2023

केज नगरपंचायत चा प्रताप:आपल्या मर्जीतील गुत्तेदाराला साभाळण्या साठी निवेदा व किंमत केल्या गायब.जवळपास चार कोटीचे कामे.

रोखठोक न्युज केज 

केज नगरपंचायत ने वार्ड क्रमांक आठ मधील खदिर इनामदार  यांच्या घरासमोर रस्त्या साठी 20 लाखाची व परत दुसरी वार्ड क्रमांक आठ साठीच सज्जाद इनामदार यांच्या घरासमोर रोड साठी 15 लाखाची,उमरीरोड साठी 98 लाखाची, घनकचरा व्यवस्थापन साठी 1 कोटी 84 लाख 98 हजार 704 रूपय,हाऊसिंग काॅलनी 51लाख 40 हजार तर वार्ड क्रमांक 15 व 16 साठी 33 लक्ष 5 हजार एकुण 4 कोटी च्या आसपास आहेत या पद्धतीत निवेदा ई टेंडर नुसार दि.20/2/23 ते27/2/23 एकूण सात दिवसांचा कालावधीत टेंडर भरायचे आहे.पण ज्या वेळेस ऑनलाइन ई टेंडर उघडले जाते त्या वेळेस एकूण सहा निवेदा दिसायला पाहिजेत पण तसे न होता फक्त दोन निवेदा दिसतात.व या निवेदा केज च्या नावाने दिसत नाहीत तर अन्य जिल्ह्य़ातील दिसतात.खरे तर निवेदा फ्लश झाल्या नंतर त्याचे नाव,लोकेशन, वार्ड, गाव तालुका,जिल्हा असे लोकेशन शासन नियमानुसार टाकने बंधनकारक असताना बाकी सर्व शासकीय विभाग या पद्धतीत कामाचे नाव व किंमत  टाकतात व निवेदा ई टेंडर करतात पण फक्त नगरपंचायत सांकेतिक नंबर टाकून निवेदा प्रस्तुत करतात.पण केज नगरपंचायत ने असे न करता नागरिक किंवा सामान्य माणूसाला निवेदा दिसु नये म्हणून काळजी घेतली आहे.तसेच निवेदा उघडल्या असता कामाची किंमत दर्शवली नाही असे आढळून आले आहे..जर  असेच असेल तर  आमदार नमिताताई मुदंडा  यांच्या नगरोत्थान योजनेतून 78 कोटीचा निधी आला तो यातल्या दोन  कामा साठी प्रस्तावित आहे तर मग नगरपंचायत वेगळी निविदा का काढली? ही निविदा नगरपंचायत च्या मुख्याधिकारी यांच्या कडून प्रस्तावित होत असताना त्यानी कशी मान्यता दिली याची जोरदार चर्चा चालु आहे तर नगरपंचायत ला यात काय गोलमाल करायचा होता तो जनतेच्या लक्षात आल्याने हे टेंडर रद्द करून दुसरे सुधारित ईटेंडर काढावे अशी मागणी होत आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!