• Fri. Jun 5th, 2026

*अपघातात नगरसेवक  पप्पू इनामदार यांच  अपघाती निधन तर एक पोलीस कर्मचारी जखमी*

Bybaba maske

Mar 2, 2023

अपघातात नगरसेवक  पप्पू इनामदार यांच  अपघाती निधन तर एक पोलीस कर्मचारी जखमी

रोखठोक न्युज 

गौतम बचुटे/केज :- केज-बीड रोडवर कोरेगाव जवळ अपघातात कार पलटी होऊन अपघात झाला. त्या अपघातात माजी नगरसेवक पप्पू (आण्णा) इनामदार यांचा मृत्यू झाला. तर पोलीस जमदार सय्यद चाँदहे जखमी झाले आहेत.

या बाबतची माहिती अशी की, दि २ मार्च रोजी सायंकाळी ६:३० च्या सुमारास माजी नगरसेक तथा विद्यमान नगरसेविका इनामदार यांचे पती पप्पू अण्णा उर्फ गजमफर इनामदार आणि केज पोलिस ठाण्यातील पोलीस जमादार सय्यद चाँद हे हे दोघे स्विफ्ट डिझायर क्र (एम एच ०४/ ई एफ ७५५७) गाडीने बीडच्या दिशेने जात असताना केज-बीड रोडवर कोरेगाव जवळील तांदळे वस्ती जवळ समोरून येणाऱ्या वाहनाला साईड देताना कार रस्त्याच्या खड्ड्यात जाऊन ती पलटी झाली त्यात गंजफर उर्फ पप्पू आण्णा यांच्या डोक्याला गंभीर मार लागला तर यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या सोबत असलेले पोलीस कर्मचारी सय्यद चाँद हे जखमी झाले जखमी पोलीस कर्मचारी सय्यद चाँद यांना बीड येथील दवाखान्यात दाखल केले आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!