• Fri. Apr 24th, 2026

*चोरीला गेलेली क्रूझर जीप केज पोलिसांच्या (डी बी) पथकाच्या ताब्यात*

Bybaba maske

Mar 2, 2023

चोरीला गेलेली क्रूझर जीप केज पोलिसांच्या (डी बी) पथकाच्या ताब्यात

भावानेच भावाची गाडी चोरल्याचा संशय !

रोखठोक न्युज 

गौतम बचुटे/केज :- लातूर येथील औद्योगिक वसाहतीतुन चोरीला गेलेली एक क्रूझर जीप केज पोलीसांच्या गुन्हेगार शोध (डी बी) पथकाने ताब्यात घेतली आहे.

या बाबतची माहिती अशी की, केज पोलिसांच्या गुन्हेगार शोध शाखा (डी बी) पथकातील पोलीस कर्मचारी दिलीप गित्ते यांना अशी गोपनीय माहिती मिळाली की, केज कळंब रोडवरील चिंचोली माळी पाटी जवळ एक सिल्व्हर रंगाची क्रूझर गाडी क्र. (एम एच २४/व्ही ७६२८) ही बेवारस स्थितीत उभी आहे. ही माहिती मिळताच दिलीप गित्ते यांनी ही माहिती त्यांचे वरिष्ठ केज पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांना दिली. त्या नंतर डी बी पथक प्रमुख पोलीस निरीक्षक राजेश पाटील, पोलीस नाईक दिलीप गित्ते, पोलीस नाईक त्रिंबक सोपणे, पोलीस नाईक संतोष गित्ते, पोलीस कॉन्स्टेबल महादेव बहिरवाळ, पोलीस नाईक शमीम शेख हे सदर संशयित क्रूझर जीप केज पोलीस ठाण्यात घेऊन आले. त्या क्रूझर जीप बाबत पोलिसांच्या गुन्हेगार शोध शाखेच्या (डी बी) पथकाने अधिक चौकशी केली असता; सदर क्रूझर जीप ही लातूर येथून चोरीला गेली होती. त्या बाबत एमआयडीसी पोलीस ठाणे लातूर येथे दि. २० फेब्रुवारी २०२३ रोजी गाडी मालक परमेश्वर हनुमंत पवार यांच्या तक्रारी वरून गु. र. नं. ११६/२०२३ भा. दं. वि. ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा तपास पोलीस निरीक्षक गोरख दिवे हे करीत आहेत.

————————————————

*जीप चोरीचे रहस्य :-* केज पोलिसांना बेवारस स्थितीत सापडलेली क्रूझर जीप ही परमेश्वर हनुमंत पवार यांनी औसा तालुक्यातील कारला येथील सोनेराव जाधव यांच्या कडून बॉण्ड पेपरवर खरेदी केली आहे. दि. १८ फेब्रुवारी रोजी परमेश्वर पवार यांचा सख्खा भाऊ आकाश हनुमंत पवार याने परस्पर घरा समोर उभी असलेली गाडी पळवून नेली. त्या नंतर त्याच्याशी परमेश्वर पवार यानी संपर्क साधला असता त्याने गाडी घेऊन गेल्याचे सांगितले. परंतु नंतर त्याने मोबाईल बंद केला होता. त्या नंतर तो सदर क्रूझर गाडी चिंचोली पाटी जवळ सोडून फरार झाला असावा. असा अंदाज आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!