• Fri. Apr 24th, 2026

केज कंळब रोड वर अपघात एक ठार दोन जखमी.

Bybaba maske

Apr 13, 2023

केज कंळब रोड वर अपघात एक ठार दोन जखमी.

रोखठोक न्युज वार्ताहर

केज दि. 13 बुधवारी दि. 12 एप्रिल रोजी मध्यरात्री बाराच्या सुमारास केज कळंब रोडवरील विठाई पुरम या ठिकाणी एका चार चाकीचा भीषण अपघात झाला. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. सदरील अपघात हा नेमका कसा झाला हे जरी अद्याप स्पष्ट झाले नसले तरी त्या अपघातामध्ये ज्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे आणि जे जखमी झालेले आहेत त्यांची ओळख पटली आहे.
परतूर पंचायत समितीचे माजी सभापती रामेश्वर भास्कर तनपुरे त्याचबरोबर नागेश उद्धवराव तनपुरे आणि निवृत्ती आप्पासाहेब तनपुरे राहणार वाढोना तालुका परतुर जिल्हा जालना हे त्यांच्या एसयूव्ही एम एच 175382 या गाडीने निघालेले होते. मात्र त्यांची गाडी केज शहरातील विठाई पुरम जवळ आली असता एका हॉटेलमध्ये घुसली आणि भीषण अपघात झाला. यामध्ये रामेश्वर भास्कर तनपुरे यांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. रात्री बाराच्या सुमारास सदरील अपघात झाला मात्र त्यांना तात्काळ उपचारार्थं केजच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी रामेश्वर तनपुरे यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. आणि अन्यत्या ठिकाणी रामेश्वर तनपुरे यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. आणि अन्य दोघे नागेश उद्धवराव तनपुरे आणि निवृत्ती आप्पासाहेब तनपुरे यांना पुढील उपचारासाठी लातूर येथे हलवण्यात आलेले आहे. अपघातातील तिघेही माजी मंत्री बबनराव लोणीकर यांचे निकटवर्तीय असल्याचे समजते. रामेश्वर तनपुरे हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते. त्यांच्या निधनामुळे परतुर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!