राष्ट्रसंत भगवान बाबा मंदिराच्या नावाखाली शिक्षक कॉलनी केज येथे प्रसाद गृहनिर्माण संस्था सर्वे नं 18 बट्टे 2 मधील ओपन स्पेस ची जागा विकून गिळंकृत करण्याचा डाव!!
राष्ट्रसंत भगवान बाबा मंदिराच्या नावाखाली शिक्षक कॉलनी केज येथे प्रसाद गृहनिर्माण संस्था सर्वे नं 18 बट्टे 2 मधील ओपन स्पेस ची जागा विकून गिळंकृत करण्याचा डाव!!
रोखठोक न्युज वार्ताहर
शिक्षक कॉलनी केज भागातील प्रसाद गृहनिर्माण संस्था सर्वे नं 18 बट्टे 2 मधील ओपन स्पेस मधील जागेत अनधिकृत पणे खरेदी विक्री केली जात आहे. सदरील ओपन स्पेस राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या मंदिरा समोर आहे हे विषेश. मंदिराच्या तिन्ही बाजूंनी अनधिकृत प्लाट काढून त्याची सर्रास विक्री करुन लुट केली जात आहे. विषेश म्हणजे ओपन स्पेस मधील प्लाट विक्री करणारे एक निवृत्त शिक्षक, एक विद्यमान शिक्षक तर एक तथाकथित राजकीय पुढारी आहेत.टाऊन सिफ्टीची व नगररचना विभागाची कसलिही मान्यता नसताना स्थानिक इंजिनिअर कडून बोगस नकाशा करून मोठ्या प्रमाणात कागदपञांची यात हेराफेरी झालेली आहे.या मध्ये काही अधिकारी वर्गाचा सुद्धा हात आहे अशी माहिती मिळत आहे.कागदपञांची मोठ्या प्रमाणात हेराफेरी करून हा महा घोटाळा झाला आहे. वास्तविक कोणत्याही सोसायटी मधील ओपन स्पेस विकता येत नाही. हा माननीय कोर्टाचा आदेश आहे. परंतु सर्व कायदे नियम पायदळी तुडवले जात आहेत. सदर गैरकारभार करून प्लाट विक्री करणाऱ्या विरोधात दि. 12/01/14 रोजी पृसाद गृहनिर्माण संस्था च्या 27 सभासदांनी लेखी तक्रार दाखल केलेली आहे.परंतू प्रशासनाने कसलीही कारवाई केली नाही.त्यामुळे या भुमाफियांचे फावले आहे.सदर लेखी तक्रार सहायक निबंधक सहकारी संस्था केज,तहसील कार्यालय केज,नगरपंचायत केज व नगर रचना व विकास विभाग मंञालय मुंबई यांच्या कडे केलेली आहे.पृसाद गृहनिर्माण संस्था च्या ओपन स्पेस मधील अनधिकृत बेकायदेशीर विकलेल्या प्लाट ची नोंद न करणे बाबत व हरकत घेणे बाबत दि. 06/02/2014 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी नगर पंचायत केज यांच्या कडे पृसाद गृहनिर्माण संस्था च्या 17 सभासदांना सभासदांनी लेखी तक्रार दाखल केलेली आहे.परंतु प्रशासनाने कसलीही कारवाई केलेली नाही.तरी प्रशासनाने त्वरित लक्ष घालून हा भ्रष्टाचार वेळीच रोखावा अशी मागणी होत आहे. या विषयाची तक्रार देखील बाबासाहेब केदार सर यांनी केलेली आहे. बाबासाहेब केदार सर यांनी रितसर तक्रार सहायक निबंधक, जिल्हा अधिकारी कार्यालय बीड व नगरविकास विभाग मंञालय यांच्या कडे केलेली आहे परंतु आजपर्यंत कसलीही कारवाई न झाल्यामुळे हा अनागोंदी कारभार चालू आहे. तरी प्रशासनाने वेळीच या अनधिकृत प्लाट विक्री वर रोख आणावी अशी मागणी या सोसायटीचे अधिकृत सदस्य बाबासाहेब केदार सर,वैभव महादेव केंद्रे व नागरिकांनी केली आहे.तसेच राष्ट्रसंत भगवान बाबा मंदिरासमोरील अनधिकृत प्लाटींग ची तिन्ही बाजूंची मोकळी जागा कोणीही खरेदी करु नये असे आवाहन केले आहे