संगीताचा छंद जोपासणारे पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील.खाकी वर्दी मागचा एक हळवा कोपरा.
रोखठोक न्युज
कुठल्या तरी हळव्या मनाचा कोपरा काही तरी सांगतो?असच काही तरी आमच्या केज पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राजेश पाटील.त्यांच्या कडे बघितल की आरोपीच्या मनात धडकी भरते असे त्यांचे व्यक्तिमत्त्व.एकदम आजच्या भाषेत सांगायचे म्हणजे बाॅडीबिल्डर.आणि तेवढेच ढांसु व्यक्तिमत्त्व.आपल्या कामगिरी मुळे सर्व तालुक्यात दंबग पोलीस निरीक्षक म्हणून ज्यांची ओळख आहे असे केज पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक आज त्यांच्यातील एक हळवा कोपरा कुठे तरी दिसला.एवढी सुंदर संगीताचे ज्ञान असलेला व्यक्तिमत्त्व आज बघितल.म्हणतात ना ज्याला संगीत कळत तोच दर्दी असतो.आज त्यांची दुसरी बाजु आणि संगीता वरच प्रेम पाहून अश्चर्य तर झालच पण एक दर्दी वर्दी मागचा माणूस हि कळाला.आज त्यांनी एक दुजे की लिये या जुन्या चित्रपटातील कैसा हैं बंधन अंजाना…. क्या तुने नहीं जांना….. हे गित बुलबुल ह्या वाद्या वर एकदम उत्कृष्ट वाजवले.
