• Sun. Apr 19th, 2026

रमेशराव आडसकर यांचा विरोधकांना हाबाडा, विरोधक चारीमुंड्या चित….!

Bybaba maske

Apr 30, 2023

रमेशराव आडसकर यांचा विरोधकांना हाबाडा, विरोधक चारीमुंड्या चित….!

रोखठोक न्युज वार्ताहर 

दि.२९ – मागच्या 50 वर्षांपासून केज बाजार समितीवर आडसकरांचे वर्चस्व राहिलेले आहे.मात्र या वेळेस बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होतील असे विरोधक बोलत होते. परंतु रमेश आडसकर यांनी पुन्हा एकदा बाजार समिती निवडणुकीच्या माध्यमातून विरोधकांना हाबाडा दिला असून बाजार समिती भाजपकडे राखण्यामध्ये ते यशस्वी झालेले आहेत.

                       बाजार समितीच्या स्थापनेपासूनच स्वर्गीय बाबुरावजी आडसकर यांचे अनेक वर्षे वर्चस्व होते. त्यानंतर रमेशराव आडसकर यांनीही बाजार समिती आपल्याकडे राखून ठेवण्यामध्ये यश मिळवले होते. आणि याचीच पुनरावृत्ती आजच्या या निकालांमधून दिसून आली असून पुन्हा एकदा रमेशराव आडसकर यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीच्या 18 पैकी 14 जागा प्रचंड बहुमताने मतदारांनी निवडून दिल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा रमेशराव आडसकरांचे बाजार समितीवर वर्चस्व सिद्ध झाले आहे. त्यामुळे केज बाजार समितीवर भाजपचा झेंडा फडकला आहे.

      बाजार समितीच्या निवडणुकीसाठी दिनांक 28 रोजी मतदान पार पडले. आणि या मतदानामध्ये मतदारांनी आडसकरांच्या बाजूने कौल दिला. शनिवारी शिक्षकांची सहकारी पतसंस्था या ठिकाणी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. यामध्ये ग्रामपंचायत मतदार संघातून चार जागा या राष्ट्रवादीकडे गेल्या मात्र उर्वरित सेवा सहकारी संस्थेच्या ज्या 11 जागा आहेत त्या 11 च्या 11 जागा रमेशराव आडसकर यांनी विरोधकांना चारीमुंडया चित करत पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

               दरम्यान बाजार समितीच्या 18 पैकी तीन जागा या आडसकर गटाच्या बिनविरोध जाहीर झालेल्या होत्या. त्यामुळे 15 जागांसाठी निवडणूक झाली आणि त्यामध्ये निर्विवाद 11 जागा निवडून आणण्यामध्ये रमेशराव आडसकरांना यश आले असून त्यांनी या निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा विरोधकांना हा हाबाडा दिल्याचे दिसत आहे. तर भाजपच्या वतीने सर्व मतदारांचे आभार रमेशराव आडसकर यांनी व्यक्त केले आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!