• Sat. Apr 18th, 2026

केज शहर व तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट.उरल्या सुरल्या फळबागांसह शेतीच नुकसान.

Bybaba maske

Apr 29, 2023

केज शहर व तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट.उरल्या सुरल्या फळबागांसह शेतीच नुकसान.

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज तालुक्यात व शहरात अवकाळी पाऊस बरसला.तांबवा, पिसेगाव,कुंबेफळ,जानेगाव परीसरात गारपीट  अवकाळी पावसात जोरदार वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाली तर आनंदगाव सारणी या ठिकाणी वाऱ्यासह मोठ मोठे झाडे पडली आहेत. त्यामुळे पंधरवाडय़ा पासुन बरसत असलेला या पाऊसा मुळे शेतकरीवर्गाच प्रचंड नुकसान झाले आहे.अंबा,फळबागांसह, भाजीपाला,सिमला मिरची यांचे नुकसान झाली असल्या कारणाने शेतकरी हवालदिल झाला आहे.ग्रामीण भागातील आर्थिक कणा असलेला शेतकरीवर्ग आता उध्वस्त झाल्याच चित्र बीड जिल्या सहित केज तालुक्यात दिसत आहे.शेतकरी वाचवायचा आसेल तर लवकरात लवकर शासनाने शेतकरीवर्गाला मदत घोषित करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!