शरद पवारांचा निवृत्तीच्या घोषणेनंतर कार्यकर्त भावनिक एकच गदारोळ.अनेक नेते कार्यकर्त्यांना अश्रू अनावर
रोखठोक न्युज वार्ताहर
मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात शरद पवार यांच आत्मचरित्र लोक माझा सांगती यांच पुस्तक प्रकाशन होते.प्रकाशन सोहळ्यात भाषण करताना आचानक शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केले व कार्यकर्त्या मध्ये अस्वस्थता पसरली. भाषण नंतर कार्यकर्त्याने एकच निवृत्ती माघारी घेण्याच्या घोषणा चालु केल्या.व अश्रू ढाळू लागले बीड जिल्याचे नेते धनजंय मुंडे यांनी तर शरद पवार यांचे अक्षरश पाय धरले.
