• Fri. Apr 24th, 2026

कलेक्टर ऑफिसातील सर्व एसी बंद; अनोखा निर्णय.केज तालुक्यातील अधिकारी  एसी च्या बाहेर पडायला तयार नाहीत.

Bybaba maske

May 8, 2023

कलेक्टर ऑफिसातील सर्व एसी बंद; अनोखा निर्णय.केज तालुक्यातील अधिकारी  एसी च्या बाहेर पडायला तयार नाहीत.

रोखठोक न्युज वार्ताहर 

बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांनी खुप मोठा निर्णय घेतला असून.त्यांनी आपल्या कार्यालयात एसी बंद केला असून या नंतर त्या एसी वापरणार नाहीत.तसेच जिल्हाधिकार्यालयात या पुढे कुठल्याच कार्यालयात एसी वापरू नये असे सांगण्यात आले असल्याने अश्या अनोख्या निर्णयाने घेतल्याने अधिकाऱ्यांसह जिल्यात चर्चेला तोंड फुटले असून जिल्ह्यातील अधिकारी काय करतात या वर लक्ष लागले आहे.कलेक्टर ऑफिसातील…म्हणजे केबिनमध्ये कसल्याही पद्धतीने एसीची हवा येता कामा नये. त्यांच्या केबिनमधील दरवाजे खिडक्या नेहमी उघड्या असाव्यात. त्यानंतर व्हीआयपी गाडीलाही एसी नसावा, त्या गाडीच्या काचाही उघड्याच असाव्यात त्याबरोबरच जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये असलेला एसी बंद करण्यास दीपा मुधोळकर यांनी सांगितले आहे. फक्त फॅन आणि खिडकीतून येणारी नैसर्गिक हवा असावी, असा त्यांचा आदेश असल्यामुळे ऐन उन्हाळ्यातही खुद्द जिल्हाधिकाऱ्यांसह कार्यालयातील कुठल्याच विभागात वातानुकूलन यंत्रणा सुरु नाही. याचं नेमकं कारण काय ?

माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपलंसं वाटलं पाहिजे. बाहेरुन घामाघूम होऊन आलेली व्यक्ती एकदम एसीत आल्यानंतर थंड हवा सहन करू शकत नाही, दुसरी गोष्ट म्हणजे सरकारी यंत्रणेतील लोकांना एसीची हवा कशासाठी हवी ? जितकी सरकारी कार्यालयं आहेत, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बागांमध्ये अनेक झाडे लावली आहेत. त्यांची मोकळी हवा ही कार्यालयाला पुरेशी असते, याचा आस्वाद घेणं सोडलं, तर एसीची हवा लागेलच कशाला? असा मोठा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

या अनोख्या निर्णयानंतर अधिकारी देखील भांबावून गेले. मात्र आता अधिकारी खिडकीतून येणाऱ्या आणि फॅनद्वारे खेळत्या राहणाऱ्या हवेतच जिल्ह्याचे काम चालताना पाहायला मिळत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाचं तंतोतत पालन होताना दिसत आहे.

आतापर्यंतच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या केबिनचे दरवाजे आणि खिडक्या नेहमीच बंद असायच्या, मात्र त्या आज प्रत्येकाला खुल्या पाहायला मिळतात. जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी खूप वेळ वाट देखील पहावी लागत नाही, कारण बाहेर कोण आलंय है। तात्काळ लक्षात येतं, जास्त प्रोटोकॉल न पाळता जनतेशी थेट संवाद साधणाऱ्या जिल्ह्यातील त्या पहिल्या जिल्हाधिकारी मानल्या जात आहेत.

जिल्ह्यात फिरत असताना नॉन एसी कार, प्रत्येक वेळेस गाडीच्या काचाही खुल्या असतात, यामुळे नेमक्या जिल्हाधिकारी कशा दिसतात, हेदेखील सर्वसामान्यांना पाहायला मिळतं. यामुळे एक वेगळाच विश्वास आणि आदर जनमानसात वाढला आहे. त्यासोबतच काही दिवसांपूर्वी या जिल्हाधिकाऱ्यांनी चक्क लाल परीमधून आपल्या कुटुंबासोबत प्रवास केल्याने जिल्हाधिकाऱ्यांविषयी आपुलकी वाढली आहे.

अनेक अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर जातात, शेतकऱ्यांशी संवाद साधतात, पाच ते दहा मिनिटांच्या भेटीनंतर पुन्हा एकदा आपल्या एसी कारमध्ये बसून आपल्या एसी केबिनपर्यंत पोहोचतात, मात्र जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी बीड जिल्ह्यात आल्यापासून अनेक वेळा जिल्ह्याचा आढावा घेतला. जिल्ह्यातील प्रश्नांवर स्वतः वेळ देऊन त्या प्रश्नांवर कशा पद्धतीने काम करता येईल आणि तो प्रश्न सोडवता येईल याकडे लक्ष केंद्रित केल्याने अनेक प्रश्न देखील जिल्ह्यात सुटत असल्याचं बोलल जात आहे.

बीड जिल्ह्यातील पहिल्याच स्त्री जिल्हाधिकारी म्हणून त्यांची बीडमध्ये नोंद झाली आहे. मात्र प्रत्येक कामावर आणि प्रत्येक अधिकाऱ्यांवर अचूक लक्ष देत ते काम पूर्ण करून घेण्यात जिल्हाधिकाऱ्यांचा हातखंडा असल्याचं त्यांच्या कामातून पाहायला मिळत आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!