मिनरल वॉटर,थंड पेये, लस्सी, रिचवणारे अधिकारी, कार्यालयात सामान्य नागरिका करिता पाण्याची सोय करतील का?
सर्व महत्त्वाच्या शासकीय कार्यालयात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा.
रोखठोक न्युज वार्ताहर
केज शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असले तहसील कार्यालय, पंचायत समिती,नगरपंचायत पोलीस स्टेशन तालुका कृषी कार्यालय, या ठिकाणी सामान्य लोंकाची कामा साठी धडपड चालू असते तालुक्यातील नागरिक कामा निमित्त या कार्यालयात मोठ्या प्रमाणात ये जा असते.”मे” महिन्यातील रखरखते ऊन,सुर्य आग ओकत असल्याचा भास व त्यात तहानेने व्याकूळ झालेला जीव अश्यात कोठे पाणी शोधण्याचा प्रयत्न केला तर पाण्याची व्यवस्था कोठेच दिसुन येत नाही.एसी च्या बंद कॅबेन मध्ये बसलेले अधिकारी मिनरल वॉटर,चहा,काॅफी,लस्सी, थंड पेय,चे घुटके घेत व त्याचे बील उचलून शासनाला भुर्दंड देणारे आधीकारी व दुसरी कडे सामान्य नागरिक मात्र पाणी पाणी करत एखाद हाॅटेल शोधत फिरत असणारे चित्र.कधी तरी एसी मध्ये बसलेल्या अधिकार्यानी आपण या सामान्य नागरिका साठी आहोत याच भान ठेवावे असे नागरिकांना वाटत आहे.त्याच मुळे तहसील कार्यालय, पंचायत समिती,नगरपंचायत,पोलीस स्टेशन,कृषी कार्यालय या तत्सम कार्यालयात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी जनतेतून होताना दिसत आहे.
