केजचे तहसीलदार दुलाजी मेंडके यांची औरंगाबाद येथे बदली.
14/3/ 2019 ते 8/5/2023 या कालावधीत त्यांनी तहसीलदार म्हणून काम पाहीले.
रोखठोक न्युज वार्ताहर
केज तालुक्याचे कर्तव्यनिष्ठ असे सगळ्याना सामान्य व आपले वाटणारे केज तालुक्याचे तहसीलदार तथा दंडाधिकारी दुलाजी मेंढके यांची औरंगाबाद येथे अन्नधान्य वितरण अधिकारी पदी बदलो झाली आहे.ज्या वेळेस कोरोना चा महा प्रलय पुर्ण देशात धुमाकूळ माजला असताना 2020 ते 2021 या काळात खूप चांगल्या पद्धतीने परिस्थीती हाताळली. स्वःता रस्त्यावर उतरून काम करणारा प्रशासन संपुर्ण केज तालुक्याने बघीतले.गेल्या चार वर्षा सेवा देत असलेले तहसीलदार यांची झालेल्या बदली मुळे सर्व सामान्याचे काम करणारे तहसीलदार जात असल्याचे शल्य हमेशा केज तालुक्यातील जनतेत राहील.
