• Fri. Apr 24th, 2026

शेतकऱ्यांच्या पाणबुडी मोटर चोरी करणारी टोळी उघडकीस . अटक आरोपीस पाच दिवसाची पोलीस कस्टडी मंजूर.

Bybaba maske

May 8, 2023

शेतकऱ्यांच्या पाणबुडी मोटर चोरी करणारी टोळी उघडकीस . अटक आरोपीस पाच दिवसाची पोलीस कस्टडी मंजूर.

रोखठोक न्युज वार्ताहर 

   दिनांक 5.5. 2023 रोजी मध्यरात्री हलक्या स्वरूपाचा पाऊस येत असल्याची संधी साधून चोरट्याने साळेगाव माळेगाव शिवारातील शेत सर्वे नंबर 231 व 232 मधील विहिरीवरील पाणबुडी मोटर चोरी करून प्रसार झाले होते. सदर चोरीचा तपास पोलीस उपधिक्षक पंकज कुमावत व पोलीस बाळासाहेब पवार यांची मार्गदर्शनाखाली डीबी पथकातील अधिकारी अंमलदार यांनी सदर घटनेचा कसोशीने छडा लावून त्याचे धागेदोरे ढोकी, शिराढोण परिसरात असल्याची खात्री झाल्यावर खाजगी वाहनाने जाऊन संशयित इसमाची माहिती उपलब्ध करून गुण्यातील संशयित आरोपी यास शिराढोण पोलीस स्टेशन हद्दीत सापळा रचून अत्यंत शिताफीने पकडण्यात आलेले आहे. सदर आरोपीने अटक होत असताना मोठा विरोध झाला तरी त्यांना ताब्यात घेण्यात यश मिळवले, त्यानंतर अधिकचे मनुष्यबळ जमा करून सदर आरोपीस विश्वासात घेऊन विचारपूस केली असता आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास ढोकी पासून 25 किलोमीटर अंतरावरील इरला येथील विद्युत पंपाची रिपेरिंग करणाऱ्या दुकानावर चोरी केलेल्या पाणबुडी मोटर ठेवण्यात आलेले असल्याचे सांगीतले. रात्रीत सदर ठिकाणी जाऊन सात पानबुडी मोटर जप्त करण्यात आल्या आहेत. सदर गुन्हा करण्यासाठी वाहनाचा वापर करण्यात आला त्या वाहनाचा व टोळीतील इतर साथीदाराचा शोध घेणे सुरू आहे. सदरची कार्यवाही मा.श्री.पंकज कुमावत साहेब ,पोलीस निरीक्षक केज बाळासाहेब पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिंदे, डीबी पथकातील सा.पोलीस उपनिरीक्षक राम यादव, पो. ना. दिलीप गीते, राजू गुजाळ, तपासी अमलदार चंद्रकांत काळकुटे यांनी केलेली आहे. सदर कार्य यशस्वी करण्या साठी पोलीस स्टेशन ढोकी येथील पोलीस आमलदार क्षीरसागर व त्यांच्या सहकाऱ्यांनी मदत केली आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!