कुठल्या “तांत्रीक” मुद्यात आडकला बहुचर्चित उमरीरस्ता: नागरिक संभ्रमात.
रोखठोक न्युज वार्ताहर
केज शहरातील सगळ्यात जास्त जटिल प्रश्न कुठला बनला असेल तर तो उमरीरोड गेल्या एका तपा पासुन भिजत पडलेल हया रस्तयाच काम तब्बल 98 लाख मंजूर झाले,उद्घाटन झाले पण याचे काम काही चालू होण्याचे लक्षण दिसेनात.केज संघर्ष समितीने अंदोलन घेण्याचा पवित्रा घेतला की लहान मुलाला जसे कुल्फी देतात तसे देऊन मोकळे होतात गेल्या 2 मे रोजी केज नगरपंचायत ने उद्घाटन केले व रस्ता करारयला दोन दिवसात चालू करू असे अश्वासन दिले पण आठवडा संपला तरी काम काही चालू झाले नाही. नेमका हा रस्ता कुठल्या “तांत्रीक” अडचणी सापडला आहे नागरिकाच्या लक्षात आता येऊ लागले आहे.त्या मुळे नगरपंचायत चा भोंगळ कारभार व चमकोगिरी केज शहरातील नागरिकांचाया लक्षात आली आहे असे बोलले जात आहे.
