• Tue. May 26th, 2026

पत्रकार महादेव गायकवाड यांना पितृशोक

Bybaba maske

May 10, 2023

दै. रणझुजांरचे पत्रकार महादेव गायकवाड यांना पितृशोक

 

गौतम बचुटे/केज :- सायं दैनिक रणाझुंजारचे केज तालुका प्रतिनिधी पत्रकार महादेव गायकवाड यांचे वडील दशरथ गायकवाड वय (८८ वर्ष) यांचे आज दि. १० मे रोजी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. 

केज येथील सायं दैनिक रणाझुंजारचे केज तालुका प्रतिनिधी महादेव गायकवाड यांचे वडील दशरथ गायकवाड हे एक लोक कलावंत आणि त्या काळातील जनावरांचे प्रसिद्ध व्यापारी म्हणून त्यांचा नावलौकिक होता. 

दशरथ गायकवाड यांचे दि. १० मे रोजी सकाळी ७:३० वा. च्या सुमारास देवगाव येथे राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय ८८ वर्ष होते. 

त्यांच्या पार्थिवावर देवगाव येथील सार्वजनिक स्मशानभूमीत दुपारी ३:०० वा. बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. 

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

गायकवाड परिवाराच्या दुःखात केज तालुक्यातील सर्व पत्रकार सहभागी असून त्यांना पत्रकारांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करण्यात आली.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!