• Fri. Apr 24th, 2026

केजच्या ‘त्या’ गुन्ह्यात अॅट्रॉसिटी कलम वाढविले. विधान परिषदेत्या उपसभापती यांनी घेतली गंभीर दखल. लहुजी सेनेच्या व सकल मांतग समाज यांच्या पाठपुराव्याला  आले यश.

Bybaba maske

May 10, 2023

केजच्या ‘त्या’ गुन्ह्यात अॅट्रॉसिटी कलम वाढविले.

विधान परिषदेत्या उपसभापती यांनी घेतली गंभीर दखल.

लहुजी सेनेच्या व सकल मांतग समाज यांच्या पाठपुराव्याला  आले यश.

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज तालुक्यातील सुशील भांगे याने पहिली बायको असतानाही यवतमाळ जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीला पळवून आणले. तिने छळाला कंटाळून आत्महत्या केली होती. ही घटना चार दिवसांपूर्वी घडली होती.

 या प्रकरणात नातेवाइकांच्या आक्षेपानंतर पोक्सो, अत्याचार, आत्महत्येस प्रवृत्त करणे या कलमांखाली गुन्हा दाखल झाला होता; परंतु यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संघटनांनी केली होती. याचीच दखल घेत आता पोलिसांनी यात अॅट्रॉसिटीचे कलम वाढविले आहे.

या प्रकरणाचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत करून शासकीय अभियोक्ता नेमावा तसेच मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून मदत मिळवून देण्यासाठी प्रस्ताव पाठवावा, अशा सूचनाही डॉ. गोऱ्हे यांनी केल्या आहेत.या प्रकरणात अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्या पासुन लहुजी सेनेच्या तालुकाध्यक्षा प्रिंयका लांडगे व सकल मांतग समाज जिल्हा बीड त्यांचे कार्यकर्ते या प्रकरणाचा पाठपुरावा करत होते काल त्यांनी न्याय भेटला नाहीतर 16/5/2020 रोजी आक्रोश मोर्चा चे आयोजन केले होते तसे निवेदन तहसीलदार,पोलीस अधीक्षक यांना दिले होते.यावर प्रियंका लांडगे, 

शितल महोदन लांडगे – निर्मला रामराजा, केशव लोंढे, दगडू गालफाडे, बाबूराव गालफाडे,अनिल मानीक गालफाडे ,निर्मला रामकिसन जाधव , क्षीरसागर सचिन रावण ,लांडगे सुर्यकांत ,खाडे सुंदर,लांडगे कमल ,दत्ता लांडगे.यांच्या स्वाक्षरी आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!