• Sat. Apr 25th, 2026

केज तालुक्यात चंदन चोरांचा सुळसुळाट !शेतकऱ्याच्या शेतातून कापून घेऊन गेले चंदनाचे झाड..

Bybaba maske

May 22, 2023

केज तालुक्यात चंदन चोरांचा सुळसुळाट !शेतकऱ्याच्या शेतातून कापून घेऊन गेले चंदनाचे झाड.

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज येथील शासकीय दवाखान्याच्या वाडीवस्तीवर चंदन चोरांचा सुळसुळाट झाला आहे. मधुकर राउत या शेतकऱ्यांचे गोठ्या शेजारील चंदनाची झाडे तोडून नेले आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. केज परिसरातील वाडीवस्तीवर अधूनमधून चंदन चोरीचे प्रकार घडत असतात. ज्या ठिकाणी चंदनाची झाडे आहेत. तेथे चोरट्यांकडून झाडे कापून नेली जातात. गेल्या काही दिवसांपासून या भागात चंदन चोरांचा सुळसुळाट झाला आहे. यामागे एखादी टोळी कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. परंतु, वनविभागाची यंत्रणा चोरीचा छडा लावण्यात अपयशी ठरली असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. चंदनाच्या झाडाला बाजारात चांगली मागणी असल्याने चोरट्यांनी अशी झाडे लंपास करण्याकडे लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येते.मधुकर राऊत यांच्या सदर चंदनाच्या झाडाची २० ते ३० फुट वाढलेले होते. गेल्या काही वर्षापुर्वी देखील अशीच चंदन चोरीची घटना घडली होती. पोलिस प्रशासनाने व वनविभागाने चंदन चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी मधुकर राउत यांनी केली आहे

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!